चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, 'सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू'

By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2023 05:59 PM2023-10-07T17:59:07+5:302023-10-07T18:00:53+5:30

Sindhutai Majhi Mai-Chindhi Banli Sindhu : ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अशा जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे.

A new chapter in the biographical saga of Chindi is beginning, 'Sindhutai Majhi Mai - Chindhi Banali Sindhu' | चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, 'सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू'

चिंधीच्या चरित्रगाथेचा सुरु होतोय नवा अध्याय, 'सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू'

googlenewsNext

कलर्स मराठीवरील 'सिंधुताई माझी माई’ (Sindhutai Mazi Mai) या मालिकेनं कमी कालावधीत रसिकांच्या मनात घर केले आहे. आता या मालिकेच्या नव्या अध्यायाचा प्रारंभ होणार आहे. ‘सिंधूताई माझी माई - चिंधी बनली सिंधू’ नवीन अध्यायामध्ये सिंधुताईंच्या हृदयस्पर्शी आणि असामान्य अशा जीवन प्रवासाचा उलगडा होणार आहे. सिंधुताई म्हणजे एक विलक्षण चैतन्य असलेली असामान्य स्त्री. आपण आजपर्यंत चिंधीचे जीवन, तिची धडपड आणि गरजूंना मदत करण्याची तिची अटळ बांधिलकी पाहिली. मात्र चिंधीने सिंधू बनण्याचा विलक्षण प्रवास सुरु होणार आहे. 

सिंधूच्या जीवनातील अनेक आव्हाने, कठीण प्रसंग, हलाखीची परिस्तिथी आणि यामधून मार्ग काढत त्यांनी सिंधू बनण्याचा प्रवास कसा पार केला हे सगळे आत्मा हेलावून ठेवणारे आणि मन सुन्न करुन जाणार आहे. त्यांचा हा खडतर प्रवास आणि त्यातून त्यांनी कसा मार्ग काढला हे सारे बघणे प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे आणि प्रेरणा देणारे ठरणार आहे. 'सिंधुताई माझी माई' मालिकेच्या उत्तम कथानकाने व कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले आणि याच उद्दिष्टाला पुढे नेत आणखी भावनिक दृष्ट्या कथानक सादर करण्याचा प्रयत्न मालिकेचा असणार आहे.

 सिंधूची भूमिका साकारणारी शिवानी सोनार म्हणाली की, "या भूमिकेसाठी मी माईंनी लिहीलेले पुस्तक वाचले. माईंना भेटणे माझ्या नशिबात नव्हते. पण जी माणसे त्यांना भेटली आणि माझ्या मित्रमंडळीपैकी ज्यांना भेटण्याचा योग आला त्यांच्याकडून त्यांचे अनुभव ऐकत मी या भूमिकेसाठी तयारी केली होती आणि अजूनही करत आहे. शूट सुरु झाल्यानंतर, मी शहरात वाढलेली मुलगी आहे तर गावाकडची कामं, गावाकडे राहणं याची कुठे तरी तयारी नव्हती पण आता मी या वातावरणाला जुळवून घेण्याचा प्रयत्न करते आहे. 


शिवानी सोनार चिंधीच्या भूमिकेसाठी खूप उत्सुक आहे. ती म्हणाली की, त्याचबरोबर एक मोठी जबाबदारी असल्यामुळे कुठे तरी थोडा नर्व्हसनेस आहे. या भूमिकेला न्याय देण्याचा मी १०० टक्के केला आहे. माझ्या आधीच्या भूमिकेसाठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. त्याचप्रमाणे या भूमिकेसाठी ही देतील याची मला खात्री आहे. माईंची गोष्ट प्रेक्षकांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न मी आणि आमची संपूर्ण टीम करत आहोत. मालिकेचे दिग्दर्शक, कलाकार या सर्वांचा मला पाठिंबा आहे. लवकरच सिंधू प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे आणि प्रेक्षकांना आवडेल अशी मी आशा करते.

Web Title: A new chapter in the biographical saga of Chindi is beginning, 'Sindhutai Majhi Mai - Chindhi Banali Sindhu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.