'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:27 AM2022-01-31T11:27:44+5:302022-01-31T11:28:27+5:30

'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणी आली आहे. या पाहुणीबद्दल जाणून घेण्यासाठी सगळे उत्सुक आहेत.

A new guest came on the set of 'Aai Kuthe Kay Karte', Arundhati started fighting | 'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा

'आई कुठे काय करते'च्या सेटवर आली नवीन पाहुणी, अरुंधतीला लागला तिचा लळा

googlenewsNext

स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) मालिकेची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मालिकेतील कथानकातील ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. या मालिकेतील पात्रांनीही रसिकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील सर्व कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. तसेच त्यांना ऑनस्क्रीनसोबत ऑफस्क्रीन काय धमालमस्ती करतात, हे जाणून घ्यायलादेखील खूप आवडते. दरम्यान आता असं समजतंय की आई कुठे काय करते मालिकेच्या सेटवर एका नवीन पाहुणीची एन्ट्री झाली आहे. 

आई कुठे काय करते या मालिकेच्या सेटवर एक नवीन पाहुणी आली आहे. होय, हे खरंय. ही पाहुणी म्हणजे कुठली अभिनेत्री नव्हे, तर एक मांजर आहे.
या मालिकेत एक मांजरीचे गोंडस पिल्लू आले आहे आणि मालिकेत काम करणाऱ्या अरुंधतीला या मांजरीच्या पिल्लूने चांगला लळा लावला आहे. अरुंधतीने हे मांजरीच्या पिल्लूसोबत एक फोटो क्लिक केला असून हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हे मांजरीचे पिल्लू प्रसिद्ध कोरियोग्राफर संतोष भांगरे यांचे असून त्यांनी हे सेटवर आणले होते. या मांजरीच्या पिल्लूची चर्चा आता सोशल मीडियावर देखील होत आहे.


दरम्यान, आई कुठे काय करते मालिकेत अरुंधतीची भूमिका अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर हिने साकारली आहे. मधुराणी हिने काही दिवसांपूर्वी मालिकेतून ब्रेक घेतला होता. ती आजारी असल्यामुळे मालिकेतील काही भागात दिसली नव्हती. मात्र आता तिने मालिकेत पुनरागमन केले आहे. त्यामुळे चाहते खूप खूश झाले आहेत. 

Web Title: A new guest came on the set of 'Aai Kuthe Kay Karte', Arundhati started fighting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.