'मुलगी पसंत आहे!'मध्ये पुन्हा रंगणार नवा डावपेच; यशोधरा चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जाणार मनशांती केंद्रात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2024 18:52 IST2024-05-29T18:52:23+5:302024-05-29T18:52:58+5:30
Mulagi Pasant Aahe : ‘मुलगी पसंत आहे!’ या या मालिकेत पुन्हा नवीन घटना पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे यशोधरेचं बदलेलं रुप. यशोधरा उर्फ अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या पात्राचं जसं रुप बदललं तसं त्यांच्या लूकमध्येही बदल करण्यात आला आहे.

'मुलगी पसंत आहे!'मध्ये पुन्हा रंगणार नवा डावपेच; यशोधरा चुकीचं प्रायश्चित्त म्हणून जाणार मनशांती केंद्रात
सन मराठी वाहिनीवरील ‘मुलगी पसंत आहे!’ या मालिकेनं पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेच्या प्रत्येक एपिसोड्समध्ये येणाऱ्या टर्निंग पाँईटमुळे, ट्विस्टमुळे ही मालिका प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. आता पुन्हा या मालिकेत नवीन घटना पाहायला मिळणार आहे आणि ती म्हणजे यशोधरेचं बदलेलं रुप. यशोधरा उर्फ अभिनेत्री हर्षदा खानविलकर यांच्या पात्राचं जसं रुप बदललं तसं त्यांच्या लूकमध्येही बदल करण्यात आला आहे.
हर्षदा खानविलकर यांची यशोधरा पात्राची स्टाईल चर्चेचा विषय बनलेली आणि महिला वर्गाकडून त्यांच्या साड्यांचे पण कौतुक करण्यात आले. आता मात्र यशोधराने स्वत:च्या लूकमध्ये बदल केला आहे, तो बदल देखील प्रेक्षकांना आवडेल याची खात्री वाटते. झालेल्या चुकांचे प्रायश्चित्त करायला मनशांती केंद्रात जाण्याचा विचार करणाऱ्या यशोधरेच्या मनात नेमकं काय चालू असेल.
खरेच तिला चुकांची जाणीव झाली असेल की आराध्याच्या विरोधात उचललेलं हे तिचं नवीन पाऊल असेल? पण यशोधराला पूर्णपणे ओळखलेल्या आराध्याला मात्र अंदाज आहे की, यशोधराच्या मनात नेमका कशाबद्द्ल डावपेच सुरु आहे. आता असा नवा कोणता खेळ यशोधरा खेळणार हे जाणून घेणे कमालीचे ठरणार आहे.