'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती नीलला पकडणार रंगेहाथ मारणार त्याच्या कानाखाली

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2022 11:04 AM2022-07-16T11:04:38+5:302022-07-16T11:14:11+5:30

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीला यशवर ज्याचा खुनाचा ठपका लागला आहे त्या नीलला ती रंगेहाथ पकडणार आहे.

A new twist in will come in Aai Kuthe Kay Karte, Arundhati will catch Neil | 'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती नीलला पकडणार रंगेहाथ मारणार त्याच्या कानाखाली

'आई कुठे काय करते'मध्ये नवा ट्विस्ट, अरुंधती नीलला पकडणार रंगेहाथ मारणार त्याच्या कानाखाली

googlenewsNext

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या मोठा ट्विस्ट आला आहे. इशाला वाचवणाऱ्या यशवर खुनाचा आरोप ठेवण्यात आला आहे त्यामुळे संपूर्ण देशमुख कुटुंब सध्या चिंतेत आहे. यामध्येच यशला या प्रकरणातून सुखरुपपणे बाहेर काढण्यासाठी अरुंधती, आशुतोष आणि अनिरुद्ध शक्य होतील तितके प्रयत्न करत आहेत. आता अरुंधती यशला या संपूर्ण प्रकरणातून सुखरुप बाहेर काढणार आहे. 

सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अरुंधतीला यशवर ज्याचा खुनाचा ठपका लागला आहे त्या नीलला ती रंगेहाथ पकडणार आहे. यात ती नीलच्या कानाखाली वाजवताना दिसतेय.
 

यात नीलचे वडील सुदर्शनच्या समोर त्याच्या एक मागोमाग एक कानाखाली वाजताना दिसतेय. इशालावर जबरदस्ती का केलीस याचा जाब विचारते तर यशने जेलमध्ये अन्न पाणी सोडलंय. यासाठी त्याला खडेबोल सुनावते. हे ऐकून नील आणि त्याचे वडील दोघेही घाबरुन जातात.

अरुंधती नीलसमोर तिच्या झालेल्या नुकसानाचा पाढाच वाचून दाखवतेय. इशाच्या मनात त्याच्यामुळे इतर पुरुषांबद्दल चीड आणि भीती निर्माण झाल्याचं सांगत त्याच्या कानाखाली वाजवते. यश जेलमध्ये डिप्रेशनमध्ये गेल्याचं सांगत पुन्हा त्याच्या कानाखाली वाजवते. नील रंगेहात सापडल्यामुळे अरुंधती यशला जेलमधून सोडवू शकले का?, यशची यातून सुखरुप सुटका होईल का?, नीलने यशला या सगळ्या प्रकरणार का अडकवलं याचा उलगडा होईल का?, या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला लवकरच मालिकेत मिळातील. 
 

Web Title: A new twist in will come in Aai Kuthe Kay Karte, Arundhati will catch Neil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.