'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवीन ट्विस्ट, गौरी घडवणार अनिल आणि मानसीला कायमची अद्दल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 12:33 PM2022-06-21T12:33:35+5:302022-06-21T12:43:00+5:30

Sukh Mhanje Nakki Kay Asta: गौरी आणि जयदीपचा संसार मोडायला निघालेल्या मानसी आणि अनिलचा पर्दाफाश होणार आहे.

A new twist will come in sukh mhanje nakki kay asta serial | 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवीन ट्विस्ट, गौरी घडवणार अनिल आणि मानसीला कायमची अद्दल

'सुख म्हणजे नक्की काय असतं'मध्ये नवीन ट्विस्ट, गौरी घडवणार अनिल आणि मानसीला कायमची अद्दल

googlenewsNext

छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे सुख म्हणजे नक्की काय असतं(sukh mhanje nakki kay asta). ही मालिका पहिल्या भागापासून लोकप्रिय झाली आणि आता तर टीआरपीच्या शर्यतीमध्येही यशस्वी घोडदौड करत असल्याचं पाहायला मिळतं. सध्या गौरी आणि जयदीप यांच्या नात्यात अनेक चढउतार येत आहेत. गौरी आणि जयदीपचा संसार मोडायला निघालेल्या मानसी आणि अनिलचा पर्दाफाश होणार आहे.

सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात पोलिस शिर्के पाटलांच्या घरात दाखल झाले आहेत. आणि मानसी आणि अनिलला रंगहाथ पकडल्याचे सांगतायेत. मानसी आणि अनिलनेही पोलिसांसमोर गुन्हाची कबुली दिली आहे.

अनिलने जयदीप बनून गौरीला कड्यावरून ढकलून मारण्याचा प्रयत्न केला होता. खऱ्या जयदीपला कोडून ठेवून तो शिर्के पाटलांच्या घरात जयदीप म्हणून वावरत होता. गौरी गीता बवून पुन्हा शिर्के पाटलांच्या घरात आली आणि तिने मानसी, अनिल आणि शालिनी यांचा पर्दाफाश करण्याचे ठरवले. खऱ्या जयदीपला घरात परत आणलं. तर दुसरीकडे मनासी जयदीपवर लग्न करण्यासाठी दबाव टाकत होती. अखेर गौरीने मानसी आणि अनिलाचा खरा चेहरा जगासमोर आणलाच.

मानसी आणि अनिल पोलिसांसमोर गुन्ह्याची कबुलीसुद्धा देतात. जयदीप पोलिसांना यादोघांना अटक करुन हे गुन्हेगार आहेत यांना शिक्षा द्या असं पोलिसांना सांगतो. आता पुन्हा एकदा गौरी आणि जयदीपच्या सुखी संसाराला सुरुवात होणार का?, की शालिनी पुन्हा एकदा त्यांच्या विरोधात नवा प्लान आखणार?, हे आपल्याला लवकरच कळेल. 
 

Web Title: A new twist will come in sukh mhanje nakki kay asta serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.