जीव माझा गुंतला मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अंतराच्या साथीनं मल्हार सुरु करणार नवा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2022 06:06 PM2022-10-17T18:06:48+5:302022-10-17T18:12:05+5:30

शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे

A new twist will come in the Jeev Majha Guntala serial | जीव माझा गुंतला मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अंतराच्या साथीनं मल्हार सुरु करणार नवा प्रवास

जीव माझा गुंतला मालिकेत येणार नवा ट्विस्ट; अंतराच्या साथीनं मल्हार सुरु करणार नवा प्रवास

googlenewsNext

कर्लस मराठीवरील रिक्षावाली अंतरा आणि मल्हार यांची गोष्ट प्रेक्षकांना पसंत पडली. परस्परविरोधी असलेले मल्हार आणि अंतरा लग्नबंधनात अडकल्यावर त्यांच्या आयुष्याला वेगळीच कलाटणी मिळाली. आतापर्यंत अंतरा आणि मल्हारने यांनी एकमेकांच्या साथीनं अनेक अडचणींना धिराने तोंड दिले. आता कुठे दोघांचा सुरळीत संसार होत होता पण आता यात एक नव वळणं आलं आहे. मालिकेत नवीन ट्विस्ट येणार आहे.

 जीव माझा गुंतला मालिके तअंतरा आणि मल्हारच्या सहजीवनाचा प्रवास एका नव्या वळणावर आहे. शितोळे कुटुंबाला होणारा त्रास मल्हारला बघवत नसल्याने तो अंतराचं घर सोडून वेगळं रहण्याचा निर्णय घेणार आहे आणि त्याला अंतराची साथ मिळणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये दोघांच्या नव्या प्रवासाला सुरुवात झाली असून, त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागणार आहे.

 हा प्रवास मल्हारसाठी जास्त आव्हानत्मक आणि खडतर असणार आहे. "तुला अजूनही हा वनवास भोगावा असं वाटेत आहे का”?- मल्हार.  आजपर्यंत मल्हारला अंतराने प्रत्येक संकटात साथ दिली आहे आणि आता देखील त्याला अंतराची खंबीर साथ मिळणार आहे. अंतराने मल्हार सरांना वचन दिले आहे, “सीतेने भोगला वनवास रघुरामचंद्राच्या साथीने, वचन देते अंतरा राहील कायम मल्हार सरांच्या सोबतीला". वनवासात अंतरा मल्हारला साथ देणार आहे. बघूया त्यांचा हा नवा प्रवास कसा राहील ? त्यांना कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागेल ? अंतराच्या साथीने मल्हारचा हा वनवास कसा सुखकर होणार हे आपल्याला लवकरच कळेल. 

Web Title: A new twist will come in the Jeev Majha Guntala serial

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.