'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदितीने होणाऱ्या रिअल लाईफ पतीसाठी लिहिली पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2022 18:55 IST2022-04-07T16:34:18+5:302022-04-07T18:55:05+5:30
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava) या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार(Amruta Pawar)ने नुकताच अमृताचा इंजिनिअर असलेल्या नील पाटीलसोबत साखरपुडा झाला.

'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं' मालिकेतील अदितीने होणाऱ्या रिअल लाईफ पतीसाठी लिहिली पोस्ट
तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं (Tuzya Mazya Sansarala Aani Kay Hava) या मालिकेतील अभिनेत्री अमृता पवार(Amruta Pawar)ने नुकताच अमृताचा इंजिनिअर असलेल्या नील पाटीलसोबत साखरपुडा झाला. साखरपुड्याचे फोटो अमृताने तिच्या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केले होते. आता तिने नीलसाठी एक खास पोस्ट लिहिली आहे.
अमृता पवारने साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच होणाऱ्या नवऱ्यासाठी पोस्ट लिहिली. यात ती लिहिते, आयुष्यभरासाठी माझा माणूस..तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून शुभेच्छांचा पाऊस पडत आहे. अनेकांनी छान जोडी, क्यूट जोडी असं देखील म्हटलं आहे.
नील हा कलाविश्वात कार्यरत नसून तो इंजिनिअर आहे. त्याचा अमृताच्या अभिनयाला चांगला सपोर्ट असल्याचे ती सांगते. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत आई बाबा आईची लाडकी लेक अशा त्रिकोणी कुटुंबातून ५० जणांच्या कुटुंबात लग्न होऊन आलेल्या अदितीची भूमिका अमृता साकारते आहे. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेव्यतिरिक्त अमृताने स्वराज्य जननी जिजामाता या मालिकेत जिजामातांची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांची खूप पसंती मिळाली होती.