अदा खानने केली जैसलमेर सफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2018 16:41 IST2018-12-03T16:31:18+5:302018-12-03T16:41:54+5:30
मोहक आणि टेलिव्हिजन वरील सौंदर्यवती असेल्या अदा खानने कलर्सचा नवा शो विष या अमृतः सितारा मधून कमबॅक केले आहे, हा शो विषकन्यांच्या दंतकथेवर आधारीत असून तो सुपरनॅचरल नाट्य आहे.

अदा खानने केली जैसलमेर सफर
मोहक आणि टेलिव्हिजन वरील सौंदर्यवती असेल्या अदा खानने कलर्सचा नवा शो विष या अमृतः सितारा मधून कमबॅक केले आहे, हा शो विषकन्यांच्या दंतकथेवर आधारीत असून तो सुपरनॅचरल नाट्य आहे. अदा खान सिताराची मुख्य भूमिका साकारत असून तिला तिची खरी ओळख माहित नाही. राजस्थानच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडत असल्यामुळे निर्मात्यांनी राजेशाही लूक यावा म्हणून जैसलमेर मध्ये चित्रीकरण केले आहे. अतिशय व्यस्त वेळापत्रक असून सुध्दा कलाकार आणि कर्मचाऱ्यांनी या भव्य शहराची सुंदरता पाहण्यासाठी वेळ काढला होता. त्यांनी तिथल्या स्थानिक खाद्यपदार्थांचा आस्वाद सुध्दा घेतला. या मेजवानी नंतर, टीम एका कोझी बोनफायर भोवती बसली होती आणि त्यांनी पारंपारिक राजस्थानी घागरा चोळी घातलेल्या स्थानिक महिलांनी सादर केलेला कालबेलिया डान्स पाहिला.
या अनुभवा विषयी बोलताना, अदा खान ऊर्फ सितारा म्हणाली, “जैसलमेर मध्ये चित्रीकरण करण्याचा अनुभव खूपच छान होता. आम्ही लक्षवेधक सोनेरी सूर्योद्य पाहण्यासाठी पहाटे 4 वाजता उठत असू. चित्रीकरणाच्या वेळापत्रकाच्या मध्ये मी उंट रपेटीचा आनंद घेतला आणि स्थानिक संगीतकारांच्या लोकसंगीताचा आनंद घेतला. शाल, बॅग इ. खरेदी सुध्दा मी माझ्यासाठी केली. मला वाटते की चित्रीकरण चालू करण्याचा तो अतिशय चांगला
मार्ग होता आणि असा प्रवास पुढेही करण्याची माझी इच्छा आहे.”
ऐवढेच नाही तर अदा एका कॉमेडी शोमध्ये सुनिल ग्रोव्हर सोबत दिसणार आहे. बॉलीवूड अभिनेता कुणाल खेमू छोट्या पडद्यावर पदार्पण करत असून तो या शोचे सूत्रसंचालन करताना दिसून येईल.