थँक्यू आई-बाबा..., मी सतत...! आदेश बांदेकरांच्या लेकानं शेअर केली खास पोस्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2022 16:33 IST2022-04-04T16:30:29+5:302022-04-04T16:33:43+5:30
Soham Bandekar Post : सोहम बांदेकर आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी पहिला वहिला पुरस्कारही त्यानं पटकावला...

थँक्यू आई-बाबा..., मी सतत...! आदेश बांदेकरांच्या लेकानं शेअर केली खास पोस्ट
लाखो वहिनींच्या घरात भावोजी बनून जाणारे अभिनेते आदेश बांदेकर (Aadesh Bandekar )आणि मराठी मालिकांमध्ये आपला वेगळा ठसा उमटवलेली अभिनेत्री सुचित्रा बांदेकर (Suchitra Bandekar) यांचा मुलगा सोहम बांदेकर (Soham Bandekar ) हा देखील आईवडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत अभिनय क्षेत्रात आला. ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून त्यानं छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आणि आपल्या पहिल्यावहिल्या मालिकेसाठी पहिला वहिला पुरस्कारही त्यानं पटकावला. नुकतंच त्याला त्याच्या अभिनयाबद्दल स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यात गौरविण्यात आलं. हा पुरस्कार मिळाल्याचा आनंद सोहमने चाहत्यांशी शेअर केला आहे. आईसोबतचा स्टार प्रवाह पुरस्कारासोबतचा एक फोटो शेअर करत त्याने सर्वांचे आभार मानले आहेत.
‘ काहींच्या मते अभिनेता असणं म्हणजे फक्त तुम्ही.तुमच्या भावना, तुमचे हावभाव, तुमची उपस्थिती. पण खरं तर तुमच्या आजूबाजूच्या लोकांबद्दल आणि वातावरणाबद्दलही ते तितकंच लागू होतं,’असं सोहमने त्याच्या लांबलचक पोस्टमध्ये लिहिलं आहे. या पोस्टमध्ये त्याने आई बाबांचेही खास आभार मानले आहेत. ‘आईबाबा आभार... मी सतत शिकत राहिन. दररोज काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न असेन,’असं त्याने म्हटलं आहे. ‘मी कौटुंबिक कार्यक्रमात फारसा हजर नसतो हे समजून घेतल्याबद्दल सर्व कुटुंबियांचे आभार’, असंही त्याने म्हटलं आहे.
‘नवे लक्ष्य’ ही सोहमची पहिली मालिका आहे. यात सोहम पीएसआय जय सुवर्णा दीक्षित ही भूमिका साकारतो आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध नवे लक्ष्य मालिकेतून घेण्यात आला आहे.
सोहमने याआधी ‘ललित २०५’ या मालिकेच्या निर्मात्याची जबाबदारी पार पडली होती. ती मालिका करत असताना त्याच्या मनात अभिनयाबद्दल आवड निर्माण झाली. एखादी भूमिका अजून प्रभावी कशी करता येईल, याचा तो मनातल्या मनात अभ्यास करू लागला. त्यातूनच त्याची अभिनय क्षेत्रातील वाटचाल सुरु झाली.