आदेश भावोजी दिसले गाईची काळजी घेताना, सोशल मीडियावर होतोय त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 05:15 PM2022-01-22T17:15:23+5:302022-01-22T17:15:57+5:30
सर्वांचे लाडके भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो चर्चेत आला आहे.
गेल्या कित्येक वर्षापासून 'होम मिनिस्टर' (Home Minister) हा कार्यक्रम महाराष्ट्रातील अनेक प्रेक्षकांचे अविरत मनोरंजन करत आहे. हा शो लोकप्रिय शोच्या यादीत गणला जातो. 'होम मिनिस्टर' या कार्यक्रमातून आदेश बांदेकर (Aadesh Bandekar) घरातघरात पोहोचले. या मालिकेतील त्यांचे सूत्रसंचालन लोकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांना संपूर्ण महाराष्ट्रात भावोजी म्हणूनच ओळखले जातात. आदेश बांदेकर चित्रीकरणानिमित्त लोकांच्या घरी गेल्यावर त्यांच्यामधील एक होऊन जातात. मी एक सेलिब्रिटी आहे याचा आव ते कधीच आणत नाही. त्यामुळे त्यांची हीच गोष्ट सर्वसामान्य लोकांना फार आवडते. आदेश बांदेकर नुकतेच चर्चेत आले आहेत तेही सोशल मीडियावरील व्हिडीओमुळे.
आदेश बांदेकर हे सोशल मीडियावर सक्रीय असून शूटिंग मधून वेळ काढत ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टी करताना दिसून येतात. नुकताच एक व्हिडीओ त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये भावोजी म्हणजेच आदेश बांदेकर हे एका गायीची काळजी घेताना या दिसून येत आहेत आणि तिच्यासोबत गप्पा मारतानाही दिसत आहेत. तुलसी.. क्षण आनंदाचा असं कॅप्शन देत त्यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा वर्षाव होताना दिसत आहे. त्यांचे चाहते त्यांचे कौतुक करताना दिसत आहेत. एका युजरने लिहिले की, वाह..किती छान. तर दुसऱ्या एका युजरने म्हटले की, एवढं मोठं व्यक्तिमत्व पण अभिमान गर्व अजिबात नाही म्हणून तुम्ही आम्हाला आमचेच वाटतात होम मिनिस्टर रोज बघतो खूप खूप शुभेच्छा.
वाढदिवसांच्या शुभेच्छांसाठी भावोजींनी मानले आभार
आदेश बांदेकर यांचा वाढदिवस नुकताच पार पडला. त्यानिमित्ताने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी लिहिले की, दरवर्षी १८ जानेवारीला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी न चुकता भेटता. या वर्षी मात्र परिस्थितीचे गांभीर्य पाहता शुभेच्छा केवळ सोशल मीडियावर स्वीकारत आहे. आपल्या सर्वांच्या निरोगी आयुष्याकरिता श्री सिद्धीविनायका चरणी प्रार्थना! काळजी घ्या, सुरक्षित राहा. आपला नम्र आदेश बांदेकर.