'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2024 02:21 PM2024-04-12T14:21:06+5:302024-04-12T14:21:37+5:30

Milind gawali: मिलिंद गवळी यांनी गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे.

aai-kute-kay-karte-serial-fame-actor-milind-gawali-share-special-instagram-post-for womens | 'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

'पुरुषांना लाजवतील अशा...'; मिलिंद गवळींनी केलं स्त्री वर्गाचं कौतुक, पोस्ट होतीये व्हायरल

गेल्या काही वर्षांपासून आई कुठे काय करते ही मालिका प्रेक्षकांचं कमालीचं मनोरंजन करत आहे. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक कलाकार आज प्रेक्षकांना त्यांच्या घरातील सदस्य असल्यासारखाच वाटतो. त्यातही सोशल मीडियावर अभिनेता मिलिंद गवळी यांची वरचेवर चर्चा रंगत असते. या मालिकेत मिलिंद गवळी अनिरुद्ध ही भूमिका साकारत आहेत. मिलिंद गवळी सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय असून ते कायम नवनवीन पोस्ट शेअर करत असतात.

मिलिंद गवळी यांनी अलिकडेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी आजच्या काळातील स्त्रियांचं कौतुक केलं आहे. सोबतच त्यांच्या लेकीचंही कौतुक त्यांनी या पोस्टमध्ये केलं आहे.

काय आहे मिलिंद गवळींची पोस्ट?

जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषात ठाण्यामध्ये स्टार प्रवाह आणि दैनिक पुढारीने व कस्तुरी क्लबने गुढीपाडव्याच्या निमित्ताने महिलांची मोटरसायकल रॅली आयोजित केली होती, महिला सक्षमीकरणाच्या निमित्ताने, स्टार प्रवाहचे “आई कुठे काय करते” या मालिकेमधून मी म्हणजे अनिरुद्ध देशमुख आणि संजनाला आमंत्रित केलं होतं. माझ्यासाठी हा अगदीच आगळा वेगळा अनुभव होता. 1000 हून अधिक महिला मोटरसायकल चालवत होत्या, अगदी नऊवारी साडी नेसून फेटा बांधून, काही पुरुषांना लाजवतील अशा छान पैकी मोटरसायकल चालवत होत्या. काही महिलांकडे चक्क एन्फिलच्या 350cc बाईक्स होत्या, माझी लेक मिथिला ज्यावेळेला एनफिल्ड चालवते तेव्हा त्या गोष्टीचा मला खरंच खूप अभिमान आणि गर्वच वाटतो. कारण, आज कित्येक पुरुषांना सायकल सुद्धा चालवता येत नाही, तिथे या मुली हे करून दाखवतात,"असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "परवा अशा सुंदर अशा पाडव्याच्या सोहळ्यामध्ये स्टार प्रवाह आणि दैनिक पुढारीने मला सुद्धा त्या हरहुनरी बायकांबरोबर मोटरसायकल चालवायची संधी दिली. त्यानंतर कोकिलाबेन हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी महिलांनी आपल्या आरोग्याची कशी काळजी घ्यायला हवी यावर छानसे लेक्चर दिलं, महिलांनी वर्षातून एकदा तरी पूर्ण चेकअप करणं गरजेचं आहे, असं त्यांनी कंटाळून सांगितलं. जर तुम्हाला सिरीयल बघायला वेळ मिळत असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यायला सुद्धा तुम्हाला वेळ काढावा लागेल, तुम्हाला जर तुमच्या कुटुंबाची काळजी घ्यायची असेल तर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मला त्यांचं बोलणं पटलं, त्या डॉक्टरांचा सल्ला सगळ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. मला खरंच छान वाटलं, मागच्या वर्षी पाडव्याला गिरगावमध्ये ढोल झांज पथकामध्ये मला ढोल वाजवण्याची संधी मिळाली होती, तेव्हाही मी भारावूनच गेलो होतो. मी स्वतः स्त्रीशक्तीला खूप मानतो, माझी आई स्त्री शक्तीची आदर्श आहे."

दरम्यान, मिलिंद गवळी सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ते कायम त्यांच्या मनातील भाव चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Web Title: aai-kute-kay-karte-serial-fame-actor-milind-gawali-share-special-instagram-post-for womens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.