आई कुठे काय करते: मधुराणीने घेतला मालिकेतून शॉर्ट ब्रेक?; खास कामासाठी पोहोचली इंदोरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2022 18:14 IST2022-05-02T15:28:31+5:302022-05-02T18:14:18+5:30
Madhurani gokhale : कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते.

आई कुठे काय करते: मधुराणीने घेतला मालिकेतून शॉर्ट ब्रेक?; खास कामासाठी पोहोचली इंदोरला
सध्याच्या घडीला मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar) हे नाव कोणत्याही व्यक्तीसाठी नवीन नाही. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत अरुंधती ही भूमिका साकारुन ती अल्पावधीत लोकप्रिय झाली. विशेष म्हणजे अरुंधती ही प्रत्येकाला आपल्याच घरातील सदस्य वाटते. त्यामुळे अनेक जण खासकरुन अरुंधतीला पाहण्यासाठी ही मालिका पाहतात. ही भूमिका साकारुन घराघरात पोहोचलेली मधुराणी सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे ती कायम तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांना देत असते.
कलाविश्वाप्रमाणे सोशल मीडियावर सक्रीय असलेली मधुराणी कायम नेटकऱ्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे तिच्या जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टींचे अपडेट्स ती चाहत्यांना देते. यात अलिकडेच तिने एक पोस्ट शेअर करत ती इंदोरला रवाना झाल्याचं सांगितलं आहे.
"इंदोर वारी...'कवितेचं पान '. कवितांचा कार्यक्रम.....सविस्तर नंतर लिहिते. शुभेच्छा असू द्या", असं कॅप्शन देत तिने विमानातील एक फोटो शेअर केला आहे. या पोस्टवरुन ती सध्या कवितांच्या कार्यक्रमासाठी इंदोरसाठी रवाना झाल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, अरुंधती अभिनेत्री असण्यासोबतच उत्तम कवयित्री आणि गायिकादेखील आहे. अनेकदा ती तिच्या कविता तिच्या आवाजात सोशल मीडियावर शेअर करत असते.