"आजींकडून रोज सकाळी मिठी, आप्पांसाठी केलेला चहा अन्.."; 'आई कुठे..'ला निरोप देताना 'अनघा'ने सांगितल्या खास आठवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2024 01:10 PM2024-12-01T13:10:51+5:302024-12-01T13:11:09+5:30
आई कुठे काय करते मालिकेत अनघाची भूमिका साकारणाऱ्या अश्विनी महांगडेने खास पोस्ट लिहिली आहे (aai kuthe kay karte)
'आई कुठे काय करते' मालिकेने प्रेक्षकांचं चांगलंच प्रेम मिळवलं. या मालिकेने निरोप घेताच अभिनेत्री अश्विनी महांगडेने खास आठवणी शेअर केल्यात. अश्विनीने मालिकेत अनघाची भूमिका साकारली होती. अश्विनी लिहिते, "आई कुठे काय करते........ #1491भाग.. अनघा या व्यक्तीरेखेचा प्रवास संपला. (मालिकेतील माझा पहिला फोटो ते समृद्धीचा शेवटचा सण. या प्रवासात मी घडले. समृध्दीने अधिक समृध्द केले. या प्रवासात सोबत असणारी सगळीच माणसं फार महत्त्वाची आहेत. कधी कधी आलेले एकटेपण सुद्धा सोबतच्या माणसांनी वाटून घेतले."
अश्विनी पुढे लिहिते की, "अर्चना पाटकर रोज सकाळच्या एका मिठीची आठवण येतेय. किशोर महाबोले आप्पा, मी १००० वेळा सिन मध्ये लिहिलेले नसेल तरी तुमच्यासाठी चहा आणायला तयार आहे. रवी करमरकर सर.. संकटांशी लढता यावे एवढी ताकद तुम्ही कायम दिली आणि म्हणून #अनघा शेवटच्या दिवसापर्यंत प्रवास करू शकली. मी कायम ऋणी असेन. नमिता वर्तक ताई... Thank you so much.. तुझे खूप डोके खाल्ले पण तू मार्ग काढून दिलेस कायम.."
अश्विनी पुढे लिहिते, "अभिषेक देशमुख माझा परफ्यूम कायम आपल्या दोघांचा आहे. तू रूमभर मारून परफ्यूम संपवलास तरी चालणार आहे. कौमुदी वालोकर यारा.. शब्द संपले. सुमंत ठाकरे श्रीमंत मुला thank you so much.. स्टार प्रवाह आणि प्रोडक्शन thank you so much.. काम करताना मजा यायला हवी आणि ती आली कारण सगळ्याच department च्या मंडळींनी खूप खुप खुप सांभाळून घेतले. मधुराणी प्रभुलकर, मिलिंद गवळी, रुपाली भोसले, अपूर्वा गोरे, गौरी कुलकर्णी, ओंकार गोवर्धन, ईलाताई, पूनम चांदोरकर, स्वरांगी मराठे, खुशबू तावडे, मुग्धा गोडबोले Special special special thanks.. वेळोवेळीच्या चर्चा, एकमेकांचे कौतुक, आदर या आणि अशा अनेक गोष्टींमुळे आपण जोडले गेलो."