'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 13:28 IST2023-01-25T13:28:09+5:302023-01-25T13:28:29+5:30
Aai Kuthe Kay Karte : 'आई कुठे काय करते' या मालिकेत आता रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहेत.

'आई कुठे काय करते' मालिकेतील अभिनेत्रीची मुलगी देखील आहे अभिनेत्री, जाणून घ्या कोण आहे ती?
स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत आता रंजक ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहेत. अरुंधतीने आशुतोषला प्रेमाची कबुली दिली आहे. मात्र अनिरुद्ध चांगलाच संतापलेला पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना मात्र हा ट्विस्ट मालिकेत कधी येतोय याची उत्सुकता आहे. या मालिकेत पूनम चांदोरकर (Poonam Chandorkar) यांनी विशाखाची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून पूनम चांदोरकरला खूप प्रसिद्धी मिळाली आहे.
अभिनेत्री पूनम चांदोरकरने तिच्या कारकिर्दीची सुरुवात अँकर म्हणून केली होती. तिने अनेक कार्यक्रम होस्ट केले ज्यात तिने भारतीय चित्रपट उद्योगातील प्रसिद्ध कलाकारांच्या मुलाखती घेतलेल्या पाहायला मिळाल्या. तसेच तिने गश्मीर महाजनी सोबतही काम केले आहे. याशिवाय मराठी वृत्तवाहिनीच्या क्राईम फाइलमध्ये देखील ती क्राइम पेट्रोलच्या मराठी आवृत्तीच्या भागांमध्ये आणि नंतर हिंदी क्राईम पेट्रोलमध्ये देखील दिसली होती. देवा तुला शुद्ध कुठे या मराठी लघुपटातही ती झळकली आहे.
छोट्या मोठ्या भूमिका साकारत पूनमने मराठी सिनेइंडस्ट्रीत स्वतःची ओळख बनवली. यातूनच तिला दाक्षिणात्य चित्रपटात सुद्धा विजय सेथुपती यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे. अभिनेत्री पूनम चांदोरकरच्या मुलीने देखील अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले आहे.
आर्या चांदोरकर ही पूनम चांदोरची मुलगी आहे. आर्याला अभिनयाची आवड असून कॉलेजमध्ये असताना तिने नाटकातून काम करण्यास सुरुवात केली. आईच्या पावलावर पाऊल टाकत आर्याने सुद्धा जाहिरात क्षेत्रात पदार्पण केलेले आहे. स्वप्नील जोशी आणि पल्लवी पाटील या जाहिरातीत प्रमुख भूमिका साकारताना दिसले होते. पहिल्याच प्रोजेक्टमधून स्वप्नील जोशी सोबत स्क्रीन शेअर करायला मिळाल्याने आर्या खूपच खूश आहे. हा प्रोजेक्ट म्हणजेच टिव्हीसीची आय आय बी फास्ट ही जाहीरात आहे. या माध्यमातून आर्या प्रथमच टीव्हीवर झळकली होती.