Video: तू अरुंधतीशी लग्न करशील?; आप्पांनी घातली आशुतोषला लग्नाची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2022 06:55 PM2022-04-10T18:55:40+5:302022-04-10T18:57:18+5:30
Aai kuthe kay karte: कांचनने आप्पांचा अपमान केल्यानंतर त्यांनी देशमुखांचं घर सोडलं आणि ते अरुंधतीकडे राहायला आले. मात्र,या काळात अरुंधती जगत असलेलं एकटेपणाचं आयुष्य पाहून त्यांनी आशुतोषला तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली आहे.
छोट्या पडद्यावर गाजत असलेली लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते (aai kuthe kay karte). सध्या ही मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर असून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांच्या विशेष पसंतीत पडत आहेत. अनिरुद्धला घटस्फोट दिल्यानंतर अरुंधतीने तिच्या करिअरच्या स्वतंत्र वाटा निवडल्या. यामध्येच तिच्या करिअरला आशुतोषमुळे कलाटणी मिळाली. आशुतोषमुळे अरुंधतीने जीवनाकडे सकारात्मकतेने पाहायला सुरुवात केली. यामध्येच आता आप्पांनी आशुतोषकडे अरुंधतीशी लग्न कर अशी विनंती केली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. यामध्ये आप्पा, आशुतोषला अरुंधतीशी लग्न कर असं सांगताना दिसत आहे. विशेष म्हणजे आप्पा आणि आशुतोष यांच्यातील हे संभाषण अरुंधती ऐकत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर आशुतोष आणि अरुंधती यांची प्रतिक्रिया काय असेल असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.
दरम्यान, कांचनने आप्पांचा अपमान केल्यानंतर त्यांनी देशमुखांचं घर सोडलं आणि ते अरुंधतीकडे राहायला आले. मात्र,या काळात अरुंधती जगत असलेलं एकटेपणाचं आयुष्य पाहून त्यांनी आशुतोषला तिच्याशी लग्न करण्याची मागणी घातली आहे. विशेष म्हणजे आशुतोषचंही तिच्यावर प्रेम आहे. मात्र, अरुंधतीच्या मताचा तो मान ठेवतो त्यामुळे प्रेम विसरुन त्याची मैत्री जपत आहे. परंतु, आप्पांनी त्याच्यासमोर ठेवलेल्या मागणीचा तो विचार करेल का? अरुंधती या लग्नाला तयार होईल का? असे अनेक प्रश्न नेटकऱ्यांना पडले आहेत. मात्र, त्याची उत्तरं प्रेक्षकांना ही मालिका पाहिल्यावरच मिळतील.