Aai Kuthe Kay Karte: अखेर पुन्हा एकदा अरुंधती आली भेटीला, सर्जरीनंतर परतली सेटवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2022 15:26 IST2022-11-09T15:19:38+5:302022-11-09T15:26:39+5:30
Aai Kuthe Kay Karte : अरुंधती गेला बराच काळ मालिकेत दिसत नव्हती. पण आता ती लवकरच मालिकेत परतणार आहे.

Aai Kuthe Kay Karte: अखेर पुन्हा एकदा अरुंधती आली भेटीला, सर्जरीनंतर परतली सेटवर
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) सध्या उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. सध्या अरुंधती यशाकडे वाटचाल करताना दिसते आहे. तसेच ती आशुतोषसोबत लग्न करणार का,याचा देखील मालिकेत अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही. त्यात अरुंधती गायनाच्या कार्यक्रमाच्या दौऱ्यावर गेल्याचं मालिकेत दाखवलं आहे. खरेतर अरुंधतीची भूमिका साकारणारी अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर(Madhurani Prabhulkar)ने ब्रेक घेतला होता. आता प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच अरुंधती मालिकेत परत येणार आहे.
अरुंधती गेला बराच काळ मालिकेत दिसत नव्हती. पण आता मालिकेच्या पुढील भागात अरुंधती परत येणार आहे. त्यामुळे आता पुढे मालिकेत काय दाखवणार याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे. मधुराणी प्रभुलकरने एक छोटी सर्जरी झाल्याने तिनं मालिकेतून ब्रेक घेतला होता. पुण्यातील तिच्या घरी ती विश्रांती करत होती. याबाबतची माहिती तिनं स्वत: चाहत्यांना सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन दिली होती.
आई कुठे काय करते मालिकेत आप्पा घरातून अचानक गायब झाल्याने सगळेच चिंतेत आहेत. पानं आणण्यासाठी गेलेले आप्पा घरी न परतल्याने देशमुख त्यांना शोधत आहेत. त्यातच एका व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याने तो आप्पांचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अरुंधती परतल्यावर ती आप्पांना शोधून काढणार का?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.