'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2024 11:14 IST2024-11-27T11:13:48+5:302024-11-27T11:14:19+5:30
'आई कुठे काय करते' चा एक प्रोमो व्हायरल होतोय.

'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) ही लोकप्रिय मालिका आता शेवटाकडे जात आहे. काही दिवसात मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होईल. ५ वर्ष चाललेल्या या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर गारुड घातलं होतं. दरम्यान मालिकेचा शेवट कसा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. दरम्यान 'आई कुठे काय करते' चा एक प्रोमो व्हायरल होतोय. यामध्ये अरुंधतीचा मृत्यू होतो असं दाखवण्यात आलं आहे.
प्रोमोमध्ये संजना आणि अनिरुद्ध टेन्शनमध्ये दिसतात. अनिरुद्ध म्हणतो, 'संजना, आपण तर भोसलेला फक्त तिला धमकी द्यायला सांगितली होती. त्याने तर अरुंधतीचा खून केला. समोर अरुंधतीचा अपघात झालेला असतो. यानंतर अभि अनिरुद्धला फोन करुन रडतच म्हणतो,'बाबा, आई गेली'. यानंतर रात्री समृद्धी बंगल्याचा दरवाजा उघडताना दिसतो आणि समोरुन एक कार येताना दिसते.
अनिरुद्धने ज्यांच्याकडून कर्ज घेतले आहे ते गुंड पैशांसाठी अरुंधतीच्या मागे लागतात. संजनाच त्यांना अरुंधतीला धमकवायला सांगते. मात्र अरुंधती गुंडांशी दोन हात करुन तिथून पळ काढते. पळतानाच तिचा अपघात होतो. त्यानंतर अभिच्या त्या फोनने अरुंधतीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होतं. आता अरुंधतीचा खरंच अपघातात मृत्यू होतो की हे सगळं अनिरुद्धला धडा शिकवण्यासाठी केलेला प्लॅन असतो हे लवकरच कळेल.