देशमुखांचा बंगला नावावर करणं संजनाला पडणार महागात, अरुंधती देणार तिच्या विरोधात लढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2022 15:40 IST2022-04-19T12:33:55+5:302022-04-19T15:40:44+5:30
अरुंधतीचं यश डोळ्यात खुपू लागल्यामुळे संजना वारंवार तिच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. मात्र, आता अरुंधती संजना विरोधात लढणार आहे.

देशमुखांचा बंगला नावावर करणं संजनाला पडणार महागात, अरुंधती देणार तिच्या विरोधात लढा
'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) ही मालिका अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या मालिकांपैकी एक आहे. उत्तम कथानक आणि त्याला साजेशा कलाकारांचा अभिनय यामुळे ही मालिका तुफान लोकप्रिय झाली. त्यातच सध्या या मालिकेत अनेक रंगतदार वळणं येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अरुंधतीचं यश डोळ्यात खुपू लागल्यामुळे संजना वारंवार तिच्या विरुद्ध षडयंत्र रचत आहे. मात्र, आता अरुंधती संजना विरोधात लढणार आहे.
स्टार प्रवाहने शेअर केलेल्या व्हिडीओ संजना अरुंधतीला तू इथली कुणीच नाहीस आणि मी मालकीण आहे असे बोलताना दिसतेय. ना पुढे नाव लागलं म्हणून बायको झालीस आणि सगळ्यांच्या विश्वास गैरफायदात घेतलास म्हणून मालकीण झालीस, मी तुझ्या विरोधात लढणार. आई-आप्पांसाठी, माझ्या मुलांसाठी आणि या घरासाठी.
अलिकडेच संजनाने संपूर्ण देशमुख कुटुंबाची प्रॉपर्टी स्वत:च्या नावे करुन घेतली. इतकंच नाही तर राहतं घरदेखील तिने तिच्या नावावर केलं. त्यामुळे अनिरुद्धसह घरातील प्रत्येकालाच जबर धक्का बसला. विशेष म्हणजे संजनाने फ्रॉड करुन देशमुखांचं घर बळकावल्यामुळे अरुंधती तिच्या विरोधात तक्रार दाखल करते.