आई कुठे काय करते: अरुंधती सोडणार आशुतोषचं घर? इशा ठरणार कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2023 19:47 IST2023-08-14T19:46:26+5:302023-08-14T19:47:02+5:30
Aai kuthe kay karte:

आई कुठे काय करते: अरुंधती सोडणार आशुतोषचं घर? इशा ठरणार कारणीभूत
छोट्या पडद्यावर 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत सध्या अनेक चढउतार येत असल्याचं पाहायला मिळत आहे. इशाने अनिशसोबत पळून जाऊन लग्न केलं आहे. त्यामुळे घरातील सगळेच जण नाराज झाले आहेत. परंतु, इशा अद्यापही तिची चूक मान्य न करता ती कशी योग्य हे दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्येच आता इशामुळे अरुंधती घर सोडून जाणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.
सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये अरुंधती, इशाला जबाबदार व्यक्ती करण्याचा विडा उचलते. तसंच येत्या काही दिवसात इशा जबाबदार व्यक्ती झाली नाही तर ती आशुतोषचं घर सोडून जाईल असंही सांगते.
अनिरुद्ध लग्नाला परवानगी देणार नाही या भीतीमुळे इशा अनिशसोबत पळून जाऊन लग्न करते. परिणामी, घरातील प्रत्येक व्यक्ती नाराज होतो. मात्र, तरीदेखील तिची ही चूक पोटात घालून सगळे जण तिचं थाटात लग्न लावायचा निर्णय घेतात. परंतु, लग्न घरात न करता हॉलमध्येच करा, या अटीवर ती अडून बसते. इतकंच नाही तर घरात आजीने ठेवलेल्या पूजेला अभि आणि अनघाच्या जागी आम्हीच बसणार असा हट्टदेखील करते. त्यामुळे तिच्यातील बालिशपणा आणि हट्टीपणा यामुळे घरातील प्रत्येक जण कंटाळला आहे.
दरम्यान, इशाला जबाबदारीचं भान कसं ओळखावं, तिने तिच्या स्वभावात कसा बदल घडवून आणावा यासाठी अरुंधतीने कंबर कसली आहे. तसंच जर इशाचं वागणं येत्या काही दिवसात बदललं नाही तर आशुतोषच्या घरात एक तर इशा राहिल किंवा मी, असा ठाम निर्णय सुद्धा अरुंधतीने घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या मालिकेत काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.