Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 18:04 IST2022-03-05T17:50:12+5:302022-03-05T18:04:21+5:30
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या अनेक मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते.

Aai Kuthe Kay Karte : अरुंधतीचा चढणार पारा अन् लगावणार अभिच्या कानशीलात
छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या अनेक मालिकांपैकी एक असलेली मालिका म्हणजे आई कुठे काय करते. या मालिकेत दररोज दाखवण्यात येत असलेल्या ट्विस्टमुळे ही मालिका दिवसेंदिवस लोकप्रिय होताना दिसत आहे. अलिकडेच अरुंधतीने देशमुखांचं घर सोडलं आहे. त्यामुळे ती तिच्या नव्या वाटचालीसाठी पुढे सरसावली आहे. मालिकेत एक वेगळं वळण येणार आहे. अरुंधती आपला मोठा मुलगा अभिच्या सगळ्यांन देखत कानाखाली लगावणार आहे.
मराठीटीव्हीइन्फोच्या रिपोर्टनुसार अभी अरुंंधतीचा जवळचा मित्र आशुतोषचा सगळ्यांसमोर अपमान करतो. आशुतोषचा केलेला अपमान अरुंधतीला सहन होतं नाही. त्यामुळे चिडलेली अरुंधती अभिच्या कानशिलात लगावणार आहे. आता यावर अभिची काय प्रतिक्रिया असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान काही दिवसांपूर्वी अनिरुद्ध आणि कांचन तिच्या चारित्र्यावर चिखल फेक करत असताना केवळ अनघा, आप्पा यांनीच तिची बाजू घेतली होती. तर अभिषेकनेही आपल्या वडिलांची साथ दिली होतो. त्यामुळे संतापलेल्या अनघाने याविषयी अभिला फटकारलं होतं. स्वत:ची मतं मांडायला शिक असा सल्ला ती अभिला देते. सोबत मी स्वतंत्र विचाराची मुलगी आहे. त्यामुळे तूदेखील तुझ्या मतावर ठाम रहा आणि ते मुद्दे सगळ्यांसमोर मांड असं सांगते. सोबतच तुझ्याशी लग्न केल्याचा मला पश्चाताप होईल असं वागू नकोस असंही त्याला ठणकावून सांगते.