'आई कुठे काय करते'मालिकेत धोका टळला आशुतोष आला शुद्धीवर, अरुंधतीचा जीव पडला भांड्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2022 17:14 IST2022-05-14T17:09:24+5:302022-05-14T17:14:49+5:30
आशुतोषची तब्येत अचानक आणखी खालावते हे बघून अरुंधतीला मानसिक धक्का बसला आणि ती पूर्णपणे खचून गेली. आता मात्र आशुतोष शुद्धीवर आला आहे.

'आई कुठे काय करते'मालिकेत धोका टळला आशुतोष आला शुद्धीवर, अरुंधतीचा जीव पडला भांड्यात
स्टार प्रवाह (Star Pravah) वाहिनीवरील 'आई कुठे काय करते' मालिका ( Aai kuthe kay karte ) सततच्या ट्वीस्टमुळे चर्चेत येत असते. मालिकेत नुकताच आशुतोषचा मोठा अपघात झालेला. यामुळे अरुंधती कोलमडून गेली आहे. त्यानंतर आशुतोषची तब्येत अचानक आणखी खालावते हे बघून अरुंधतीला मानसिक धक्का बसला आणि ती पूर्णपणे खचून गेली. आता मात्र आशुतोष शुद्धीवर आला आहे.
नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो समोर आला आहे. यात अरुंधती यशसोबत आशुतोषला बघण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आली आहे. आशुतोषची आई,नितीन आणि अविनाश हे आधीपासूनच हॉस्पिटलमध्ये असतात. आशुतोषची आई अरुंधतीला त्याने औषधांना प्रतिसाद दिल्याचं सांगते. डोळे उघडून एकदोन वाक्य बोलल्याचं सांगेत. आशुतोषचा एमआरआय बरा आल्याचंही त्या अरुंधतीला सांगतात. आशुतोषला डोक्यातील रक्तस्त्राव आता थांबला आहे. औषधांनी आशुतोष पूर्ण बरा होऊ शकतो त्याला ऑपरेशनची गरज लागणार नाही हे कळल्यावर अरुंंधतीच्या डोळ्यातून आनंद अश्रू येऊ लागतात ती आशुतोषच्या आईला मिठ्ठी मारते. डॉक्टर येऊन पेशंट कसा आहे अस विचारताच नितिन पेशंट उत्तम असल्याचं आनंदात सांगतो.
दरम्यान, आशुतोषप्रमाणेच अरुंधतीलाही प्रेमाची जाणीव झाली आहे. मात्र, तिचं हे अव्यक्त प्रेम आशुतोष समोर व्यक्त होईल का? आशुतोष बरा झाल्यावर अरुंधती हे त्याला सांगेल का ? पुढे काय घडेल या मालिकेत हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे.