'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 13:50 IST2025-01-31T13:42:50+5:302025-01-31T13:50:31+5:30
मालिका संपल्यानंतर अभिषेक त्याचा क्वालिटी टाइम पत्नीसोबत घालवत आहे. अभिषेक पत्नीसोबत फिनलँड येथे गेला आहे. तिथे त्याने नॉर्दर्न लाइट्सची किमया अनुभवली. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे.

'आई कुठे काय करते' फेम अभिनेता पत्नीसह पोहोचला फिनलँडला, अनुभवली ‘नॉर्दर्न लाइट्स’ची किमया, म्हणाला...
'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या आणि लोकप्रिय ठरलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेचं प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान आहे. 'आई कुठे काय करते' मालिकेतील देशमुख कुटुंब आणि अरुंधती प्रेक्षकांना भावली. या मालिकेतील कलाकारांवार प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं. 'आई कुठे काय करते'मुळेच अभिनेता अभिषेक देशमुखलाही प्रसिद्धी मिळाली.
मालिका संपल्यानंतर अभिषेक त्याचा क्वालिटी टाइम पत्नीसोबत घालवत आहे. अभिषेक पत्नीसोबत फिनलँड येथे गेला आहे. तिथे त्याने नॉर्दर्न लाइट्सची किमया अनुभवली. याचा अनुभव त्याने शेअर केला आहे. "Northern Lights!! North Finland च्या Rovaniemi, Finnish Lapland हून उत्तरेला 6 तास Aurora lights चा पाठलाग करत sweden ची बॅार्डर क्रॅास केली आणि निसर्गाची नेत्रदिपक किमया अनुभवली..कॅमेरात capture झालेले lights चे रंग आम्ही उघड्या डोळ्यांनी सलग 40 मिनिटे पाहिले", असं त्याने म्हटलं आहे.
अभिषेक देशमुखने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. पसंत आहे मुलगी मालिकेत तो मुख्य भूमिकेत दिसला होता. 'आई कुठे काय करते'मध्ये त्याने यशची भूमिका साकारली होती. अभिषेकची पत्नी कृतिका देवदेखील लोकप्रिय अभिनेत्री आहे. कृतिकाने मराठीबरोबरच हिंदीमध्येही काम केलं आहे.