चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 13:13 IST2025-01-01T13:13:09+5:302025-01-01T13:13:33+5:30

'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील कुटुंबीयांसह नववर्षाचं स्वागत केलं. थर्टी फर्स्टसाठी अश्विनीच्या घरी खास पोपटी बनवण्याचं आयोजन केलं गेलं होतं.

aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade made popati shared video | चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ

चिकन, अंडी, शेंगा अन्...; 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीची कुटुंबासोबत 'पोपटी' पार्टी, शेअर केला व्हिडिओ

२०२४ या वर्षाला निरोप देत सगळ्यांनी नववर्षाचं स्वागत केलं. सेलिब्रिटींनीही कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत थर्टी फर्स्टचं जंगी सेलिब्रेशन केलं. 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्री अश्विनी महांगडेनेदेखील कुटुंबीयांसह नववर्षाचं स्वागत केलं. त्याबरोबरच थर्टी फर्स्ट पार्टीचं आयोजनही करण्यात आलं होतं. याचा व्हिडिओ अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडियावरुन शेअर केला आहे. 

अश्विनीने कुटुंबीयांसोबत २०२४ वर्षाचा शेवटचा दिवस घालवला. तर २०२५ या नववर्षातील पहिल्या दिवसाचंही मोठ्या जल्लोषात स्वागत केलं. थर्टी फर्स्टसाठी अश्विनीच्या घरी खास पोपटी बनवण्याचं आयोजन केलं गेलं होतं. अश्विनीने शेअर केलेल्या व्हिडिओत मातीच्या मडक्यात चिकन, अंडी, शेंगा टाकून ते भट्टीत भाजतात त्याप्रमाणे अंगणात आग लावून भाजल्याचं दिसत आहे. हा व्हिडिओ शेअर करत अश्विनीने पोस्टही लिहिली आहे. 

"आनंद साजरा करायला कारण शोधायचे आणि तो क्षण आपल्या कुटुंबासोबत साजरा करायचा. सगळ्यात महत्वाचे हे की आई वडील आपल्या येण्याकडे डोळे लावून बसतात तर त्यांना वेळ द्या. इंग्रजी नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. Thank you 2024.
Welcome 2025.🧿🦋❤️ टिप - बापरे तुम्ही हे वर्ष साजरे करता मग कसले मराठी चा आदर असे प्रश्न पडत असतील तर पोस्ट पुढे ढकलून मोकळे व्हा", असं तिने पोस्टमध्ये म्हटलं आहे. 


दरम्यान, अश्विनीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. 'स्वराज्यरक्षक संभाजी' या मालिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. 'आई कुठे काय करते' मालिकेत ती अनघाच्या भूमिकेत होती. तिने 'महाराष्ट्र शाहीर', 'बॉईज', 'टपाल' या सिनेमांमध्येही काम केलं आहे. 

Web Title: aai kuthe kay karte fame actress ashwini mahangade made popati shared video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.