'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

By कोमल खांबे | Updated: March 11, 2025 13:24 IST2025-03-11T13:22:11+5:302025-03-11T13:24:08+5:30

गौरीने नवा लूक केला आहे. गौरीने तिचे लांबसडक केस कापले आहेत. नव्या लूकचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे.

aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni new hair cut look video | 'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

'आई कुठे काय करते' फेम गौरीचा बदलला लूक, लांबसडक केस कापले अन्...; आता कशी दिसते पाहा

'आई कुठे काय करते' ही छोट्या पडद्यावरील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. ५ वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आणि टीव्हीवर अधिराज्य गाजवणाऱ्या या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. 'आई कुठे काय करते' मालिकेमुळे अनेक कलाकारांना लोकप्रियता मिळाली. या मालिकेत गौरीची भूमिका साकारून अभिनेत्री गौरी कुलकर्णी घराघरात पोहोचली. पण, अचानक मधूनच तिने मालिकेतून एक्झिट घेतली होती. 

मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेल्या गौरीचा चाहता वर्ग मोठा आहे. ती सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. नवीन प्रोजेक्टबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. नुकतंच गौरीने नवा लूक केला आहे. गौरीने तिचे लांबसडक केस कापले आहेत. गौरीने न्यू हेअर कट केला आहे. नव्या लूकचा व्हिडिओ अभिनेत्रीने शेअर केला आहे. गौरीचा हा बदललेला लूक चाहत्यांच्याही पसंतीस उतरला आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. 


गौरीने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. काही नाटकांमध्येही तिने काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात येण्याआधी गौरी प्रायव्हेट सेक्टरमध्ये नोकरी करत होती. पण, अभिनयात करिअर करायचं म्हणून तिने नोकरी सोडली. 'आई कुठे काय करते' मुळे तिला प्रसिद्धी मिळाली. 'प्रेमास रंग यावे' मालिकेतही ती दिसली होती. 

Web Title: aai kuthe kay karte fame actress gauri kulkarni new hair cut look video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.