'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."
By कोमल खांबे | Updated: February 12, 2025 11:20 IST2025-02-12T11:19:20+5:302025-02-12T11:20:18+5:30
कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

'आई कुठे...' फेम अभिनेत्रीच्या नवऱ्याने खरेदी केली नवी कोरी कार, म्हणाली- "पहिली गाडी..."
'आई कुठे काय करते' ही मराठी टेलिव्हिजनच्या इतिहासातील गाजलेल्या मालिकांपैकी एक आहे. या मालिकेने सुरुवातीपासूनच प्रेक्षकांच्या मनात घर केलं होतं. मालिकेत अरुंधती आणि देशमुख कुटुंबाने प्रेक्षकांना आपलंसं केलं. या मालिकेने काही कलाकारांनाही लोकप्रियता मिळवून दिली. याच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री कौमुदी वलोकर. कौमुदीने मालिकेत यशची पत्नी आरोहीची भूमिका साकारली होती.
कौमुदी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं दिसतं. काही दिवसांपूर्वीच तिने लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. आता कौमुदीच्या नवऱ्याने नवी कोरी कार खरेदी केली आहे. याबाबत कौमुदीने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे. कौमुदीने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये कारचा फोटो शेअर करत नवऱ्याचं कौतुक केलं आहे. "पहिली गाडी नेहमीच स्पेशल असते", असं तिने म्हटलं आहे. कौमुदीच्या नवऱ्याने mazda या कंपनीची कार खरेदी केली आहे.
दरम्यान, कौमुदीच्या नवऱ्याचं नाव आकाश असं आहे. २०२३च्या अखेरीस कौमुदी आणि आकाशने प्रेमाची कबुली देत साखरपुडा केला होता. डिसेंबर २०२४मध्ये लग्नाच्या बेडीत अडकत त्यांनी सप्तपदी घेतले. त्यांच्या लग्नाच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा रंगली होती.