'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने फॉलो केला Trend; गुलाबी साडी गाण्यावर डान्स अन् विषय END
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2024 03:26 PM2024-04-05T15:26:26+5:302024-04-05T15:26:50+5:30
विषय End! 'आई कुठे...' फेम अभिनेत्रीने गुलाबी साडी गाण्यावर बनवला रील व्हिडिओ
टीव्हीवरील अनेक गाजलेल्या मालिकांपैकी एक म्हणजे 'आई कुठे काय करते'. स्टार प्रवाहवरील या मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. या मालिकेतील अरुंधती आणि देशमुख कुटुंबावर प्रेक्षक प्रेम करतात. आई कुठे काय करते मालिकेत आरोही ही भूमिका साकारून अभिनेत्री कौमुदी वलोकर घराघरात पोहोचली. या मालिकेतील तिच्या पात्रालाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. कौमुदी सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सध्या सोशल मीडियावर 'गुलाबी साडी' हे गाणं ट्रेंडिंग आहे. या गाण्यावर अनेक सेलिब्रिटींनी रील व्हिडिओ केले आहेत. बॉलिवूड सेलिब्रिटींनाही 'गुलाबी साडी' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. माधुरी दीक्षितपासून ते रेमो डिसुजापर्यंत अनेकांनी या गाण्यावर डान्स केला आहे. तर अनेक मराठी सेलिब्रिटीही 'गुलाबी साडी' गाण्यावर थिरकताना दिसले. आता कौमुदीनेही या गाण्यावर डान्स केला आहे. गुलाबी साडी नेसून कौमुदी या गाण्यावर थिरकल्याचं पाहायला मिळत आहे. या गाण्यावर रील करत कौमुदीने ट्रेंडचा विषय एण्ड केल्याचं म्हटलं आहे.
कौमुदीने तिच्या इन्स्टाग्रामवरुन गुलाबी साडी गाण्यावरील डान्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तिने गुलाबी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केला आहे. केसात गजरा माळत मराठमोळ्या लूकमध्ये कौमुदीचं सौंदर्य खुललं आहे. या व्हिडिओला तिने "ट्रेंड, विषय एण्ड" असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. कौमुदीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने साखरपुडा केल्याची गुडन्यूज चाहत्यांना दिली होती. लवकरच कौमुदी लग्नबंधनात अडकणार आहे.