'आई कुठे काय करते'मधील ही अभिनेत्री झळकली 'चंद्रमुखी' चित्रपटात, तिची पोस्ट आली चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 07:19 PM2022-05-25T19:19:35+5:302022-05-25T19:20:27+5:30
टेलिव्हिजन जगतातील लोकप्रिय अभिनेत्रीनं आपल्या साकारायला मिळालेल्या शेवंता या भूमिकेबद्दल एक पोस्ट लिहिली आहे. सध्या तिची पोस्ट चर्चेत आली आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करते(Aai Kuthe Kay Karte)मधील अंकिताच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री राधा सागर (Radha Sagar) सध्या दुसऱ्या मालिकेत काम करताना दिसते आहे. ही मालिका म्हणजे कलर्स वाहिनीवरील सुंदरा मनामध्ये भरली (Sundara Manamadhye Bharli). त्याशिवाय नुकतीच ती अमृता खानविलकर(Amruta Khanvilkar)च्या चंद्रमुखी (Chandramukhi) चित्रपटातही झळकली आहे. तिने या चित्रपटात साकारलेल्या भूमिकेबद्दल सोशल मीडियावर लिहिले आहे. तिची ही सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आली आहे.
अभिनेत्री राधा सागर हिने इंस्टाग्रामवर चंद्रमुखी चित्रपटाच्या सेटवरील तिचा अमृता खानविलकरसोबतचा फोटो शेअर केला आहे आणि लिहिले की, शेवंता सारखं कॅरेक्टर मला करायला मिळाले हे मी माझं भाग्य समजते. अमृता बद्दल काय बोलू? ती खूप कमाल आहे अभिनेत्री म्हणून आणि व्यक्ती म्हणून सुद्धा,सेटवर ती सर्वांशी मिळून मिसळून राहायची. सो मला त्या निमित्ताने एक खूप चांगली मैत्रीण "चंद्रा"च्या रुपात भेटली असं म्हणता येईल. "अमृता" जी काय या चित्रपटात दिसली आहे ते खूप अप्रतिम आहे. ही गोष्ट,चंद्राच कॅरेक्टर, "आदिनाथ"चे कॅरेक्टर, सगळ्यांचे अभिनय,कास्टिंग,सगळंच कसं परफेक्ट होतं. आणि आमची भट्टी पण छान जमून आली.
तिने या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, सगळ्यांच्या कॉश्च्युमचे श्रेय मला असं वाटतं "मंजू ताई"कडे जातं. "अजय अतुल" सारखे दिग्गज संगीतकार आणि प्लॅनेट मराठी सारखा तगडा ओ टी टी प्लॅटफॉर्म हे याचे आधारस्तंभ होते. या प्रोजेक्टला चार चांद लावले ते म्हणजे "प्रसाददा" आणि "संजय सर यांनी." फिल्म बघताना प्रत्येक फ्रेम काहीतरी मनात घर करून जाते. आणि "प्रसाददा" म्हणजे खरंच खूप टॅलेंटेड सेन्सिबल आणि समोरच्या कडून खूप उत्तम पद्धतीने नॅचरली काम काढून घेण्याची शैली अवगत असलेला असा उत्तम अभिनेता आणि दिग्दर्शक आहे असं मला वाटतं. सगळ्यांना फिल्म खूप चांगली ब्लॉकबस्टर हिट झाली यासाठी शुभेच्छा. अमू तुझ्या सोबत काम करून खूप छान वाटलं..लव्ह यू.