'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची खरी आई होती खूप साधीभोळी, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2022 01:59 PM2022-06-16T13:59:06+5:302022-06-16T13:59:32+5:30

Aai Kuthe Kay Karte Fame Milind Gawali: मिलिंद गवळीच्या सोशल मीडियावरील व्हिडीओची होतेय चर्चा

'Aai Kuthe Kay Karte' Fame Aniruddha's real mother was very simple, the actor's post in the discussion | 'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची खरी आई होती खूप साधीभोळी, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'आई कुठे काय करते' फेम अनिरुद्धची खरी आई होती खूप साधीभोळी, अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका आई कुठे काय करतेने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील पात्रांना रसिकांची पसंती मिळताना दिसते. या मालिकेतील कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतात. दरम्यान आता या मालिकेत अनिरुद्धची भूमिका साकारणारा अभिनेता मिलिंद गवळीने आईचा व्हिडीओ शेअर करत पोस्ट लिहिली आहे.

मिलिंद गवळीने इंस्टाग्रामवर आईचा व्हिडीओ शेअर करत म्हटले,  आई.. “माझी माय “ सुशीला धोंडीराम निमसे लग्नानंतर सुशिला श्रीराम गवळी
लग्नाच्या तीन वर्षानंतर मिलिंदची आई ,तिला छान वाटायचे मिलिंदची आई ऐकायला, धुळ्याला होती मग नाशिकला आली, आजोबा कामानिमित्त बरेच वेळा मुंबईला यायचे ,तिची खूप इच्छा होती मुंबई बघायची, पण आजोबा कधी तिला मुंबईला घेऊन आले नाहीत. पण मुंबई हे तिचं स्वप्न होतं ,पाचवीपर्यंत शिक्षण झालं आठ भावंड म्हणून आईला वयाच्या सातव्या वर्षापासून स्वयंपाकात घर कामात मदत करायला सुरुवात केली, अगदी लहान वयातच सुगरण झाली, इतकी सुगरण की कोणीही तिच्या हातचं खाल्लं की जन्मात विसरायचा नाही, एकदा तर रत्नाकर मतकरींसाठी आईने पुरणपोळ्या केल्या होत्या त्यांना इतक्या आवडल्या की त्यांनी त्या पुरण पोळ्यांविषयी लिहिलं होतं, कठीण कठीण पदार्थ ती अगदी सहज करायची, अनारसे लाडू,पन्नास पन्नास पोळ्या तर ती सहज लाटायची हसत-खेळत. तिला कळलं होतं की माणसाच्या हृदयाचा रस्ता त्याच्या पोटातं जातो, पोटभर चविष्ट खाल्लं की माणसाचं मन भरतं आणि एकदा का मन भरलं की त्या अन्नाची चव जन्मभर हृदयातंन जात नाही, आता आई नाहीये पण तिच्या हातच्या अन्नाची चव ही अनेकांच्या जिभेवर अजूनही ताजी ताजी आहे.


अभिनेत्याने पुढे लिहिले की, वयाच्या सोळाव्या वर्षी श्रीराम गवळी यांचं स्थळ आलं सब इंस्पेक्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेले आणि पोस्टिंग मुंबईत मिळालेलं आता आयुष्यात कधीही मुंबई सोडून जायचं नाही हे तिने मनात निश्चय केला. हे आयुष्य कसं जगावं हे तिला कळलं होतं फक्त निस्वार्थ प्रेम भेदभाव न करता जगावर करावं जगण्यावर करावं सगळे सण ती मनापासून साजरी करायची नवरात्रीतले नऊ दिवस उपास दिवाळी साजरी करावी तर तिनेच शेजारच्या खान बहीण बरोबर ईद सुद्धा साजरी करायची खाली राहणाऱ्या क्रिश्चन कुटुंबाबरोबर क्रिसमस सुद्धा साजरी करायची , रंगपंचमी हा तिचा आवडता सण कुठल्याही धर्माचा विचार न करता बिनधास्तपणे त्यांनासुद्धा ती रंग लावायची. आज खूपच आठवण आली म्हणून थोडसं तिच्याविषयी लिहावसं वाटलं वंदे मातरम

Web Title: 'Aai Kuthe Kay Karte' Fame Aniruddha's real mother was very simple, the actor's post in the discussion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.