Madhurani Gokhale: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी अरुंधतीने दिला मैत्रिणींना खास सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2023 17:53 IST2023-03-08T17:41:28+5:302023-03-08T17:53:54+5:30
सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने आज जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने एक कविता वाचून दाखवली आहे.

Madhurani Gokhale: 'कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा..', जागतिक महिला दिनी अरुंधतीने दिला मैत्रिणींना खास सल्ला
मराठी कलाविश्वातील गुणी अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर (madhurani gokhale-prabhulkar). उत्तम अभिनय आणि स्वभावातील साधेपणा यामुळे तिने अल्पावधीत प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून मधुराणीला तुफान लोकप्रियता मिळाली. या मालिकेत तिने अरुंधती ही भूमिका साकारुन घराघरात आपलं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या मधुराणीने आज जागतिक महिला दिनाच्यानिमित्ताने एक कविता वाचून दाखवली आहे.
सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या कलाकारांपैकी एक मधुराणी प्रभुलकर आहे. अभिनेत्रीचा कविता वाचून दाखवतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. तिनं यासोबत पोस्ट लिहित म्हटलं आहे की, माझ्या सर्व मैत्रिणींना जागतिक महिला दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...!संजीवनी बोकील ह्यांची माझी अतिशय लाडकी कविता खास तुमच्यासाठी. कुणी नसलं तरी चालेल..तुझी तू रहा...
मधुराणीच्या या व्हिडिओवर कमेंट करत चाहत्यांनी देखील महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अतिशय आवडती कविता...आणि आजच्या दिवसासाठी एकदम समर्पक, अप्रतिम ओळी आहेत, खुप खुप छान आणि त्यात कविता मांडण्याची पद्धत तर अप्रतिम. त्यामुळेच कविता आणखी हृदयस्पर्शी होते. अशा वेगवेगळ्या कमेंट्स चाहत्यांनी या कवितेवर केल्या आहेत.
मधुराणी एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण ती उत्तम कवित सादर करते हे चाहत्यांना माहित असेलच. ती अनेकवेळा तिच्या कविता सदीकरणाच्या कार्यक्रमाची माहिती सोशल मीडियाच्या माध्यामातून चाहत्य़ांनसोबत शेअर करत असते.