"जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी..." मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2024 01:40 PM2024-01-24T13:40:04+5:302024-01-24T13:40:44+5:30

'आई कुठे काय करते' मध्ये जान्हवी मनू या बालकलाकाराच्या भूमिकेत आहे.

Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared post for child actress janhavi | "जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी..." मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

"जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी..." मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

टेलिव्हिजनवरील सर्वात लोकप्रिय मराठी मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) सध्या रंजक वळणावर आहे. मालिकेतील सर्वच पात्र आता प्रेक्षकांच्या अगदी जवळचे झाले आहेत. आता मालिकेतील आणखी एका पात्राने प्रेक्षकांना आपलंसं केलं आहे. ते म्हणजे चिमुकली मनू. जान्हवीने मनू हे बालकलाकाराचं पात्र साकारलं आहे अगदी अभिनेत्री मधुराणीही (Madhurani Prabhulkar) या चिमुरडीचं कौतुक करत आहेत. मधुराणीने छोट्या मनूसाठी खास पोस्ट शेअर केली आहे. 

'आई कुठे काय करते' मध्ये जान्हवी मनू या भूमिकेत आहे. अरुंधती आणि आशुतोष मनूला दत्तक घेणार आहेत. दरम्यान ७ वर्षांची ही चिमुरडी किती प्रामाणिकपणे काम करते हे पाहून मधुराणीही प्रभावित झाली आहे. मधुराणीने सोशल मीडियावर मनूसोबतचे झोपाळ्यावरील फोटो शेअर केले आहेत. दोघीही स्क्रीप्ट वाचताना दिसत आहे. यामध्ये मधुराणी लिहिते,"मनू, अर्थात जान्हवी...काय सुंदर काम करते . आणि रोज आम्हाला थक्क करत असते
जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी...! ह्या वयात तिचा तिच्या कामावर असणारा फोकस, निष्ठा ,प्रेम patience, लगन हे सगळं अवाक करणारं आहे.मी नुसतं तिला बघूनच तिच्याकडून किती गोष्टी रोज शिकत असते. मला तिचं कौतुक वाटतंच पण खरं सांगायचं तर तिच्याप्रती एक प्रकारचा आदर वाटतो. आणि ते वाटणं अतिशय गोड वाटतं. आमच्या टीममध्ये जान्हवी असणं हे आमचं सौभाग्यच आहे."

मधुराणीच्या या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. चाहत्यांनीही चिमुकल्या जान्हवीचं कौतुक केलं आहे. 'हो खरंच फार गोड आहे ती...छान काम करते...' अशी कमेंट एकाने केली आहे.

Web Title: Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared post for child actress janhavi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.