अभिनेत्री असण्यासोबतच मधुराणी झाली शिक्षिका; मुलीच्या शाळेत दिले कवितेचे धडे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 05:03 PM2023-07-07T17:03:36+5:302023-07-07T17:04:07+5:30
Madhurani prabhulkar:अलिकडेच मधुराणीने तिच्या लेकीच्या शाळेत शिक्षिका म्हणून हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मधुराणी गोखले-प्रभुलकर. 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेच्या माध्यमातून मधुराणी घराघरात पोहोचली. बऱ्याच वर्षानंतर तिने या मालिकेतून कमबॅक केलं. मात्र, पुन्हा एकदा तिच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांवर तिने चालवली. मधुराणी उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच सूत्रसंचालिका, गायिकादेखील आहे. मात्र, आता ती चक्क शिक्षिकादेखील झाली आहे.
मधुराणी सोशल मीडियावर कायम तिच्या कविता वाचनाचे व्हिडीओ शेअर करत असते. परंतु, यावेळी तिने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी अधिक पसंती दिली. आहे. अभिनेत्रीसोबतच आता ती लहान मुलांची शिक्षिकादेखील झाली आहे.
अलिकडेच मधुराणीने तिच्या लेकीच्या शाळेत शिक्षिका म्हणून हजेरी लावली. सध्या सोशल मीडियावर तिचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वरालीच्या शाळेत मुलांना कविता म्हणायला शिकवत आहे. मधुराणीने यावेळी मुलांना कुसुमाग्रज, शांता शेळकेंच्या कविता वाचून दाखवल्या. सोबतच त्यामागचा अर्थही समजावून सांगितला.
"स्वरालीच्या ' गोकुळ ' शाळेत काल कविता शिकवायला गेले होते. कुसुमाग्रज, ग दि मा, शांता शेळके , विंदा , नलेश पाटील अशा मोठमोठ्या कवींच्या कविता अर्थ समजून घेत घेत आम्ही एकत्र म्हटल्या. मुलांचा उत्साह , प्रत्येक कवितेतून अर्थ उलगडताना त्यांचे कुतूहलाने लुकलूकणारे डोळे, 'अजून एक, अजून एक कविता' अशी त्यांची आर्जवं. हे सगळंच फार प्रेमात पडणारं होतं", असं मधुराणीने म्हटलं आहे.
पुढे ती म्हणते,"याच वयात मुलांना आपण कवितेची गोडी लावली, त्यातून मिळणाऱ्या निर्भेळ आनंदाची ओळख करून दिली तर आयुष्यातल्या बऱ्या वाईट प्रसंगात मनावर फुंकर घालणारी जन्मभराची एक सखीच मिळवून दिली. मुलांबरोबर कविता गायला हव्यात. त्यातला निर्मळ आनंद असा लुटत राहायला हवा. गोकुळ च्या संचालिका डॉ. ज्योत्स्ना पेठकर हिनी माझ्या मागे लागून माझ्याकडून हे करून घेतलं .... ह्या काव्यप्रेमीचे आभार".