'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 03:02 PM2023-08-21T15:02:53+5:302023-08-21T15:03:36+5:30

Aai kuthe kay karte: नुकतेच या मालिकेने एक हजार भाग पूर्ण केले आहेत.

aai kuthe kay karte fame marathi actress rupali bhosale special thanks post | 'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका

'तुझे आभार कधी..'; 'या' व्यक्तीमुळे रुपालीला मिळाली 'आई कुठे..' मालिका

googlenewsNext

सध्याच्या घडीला छोट्या पडद्यावर जर अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका कोणती? असा प्रश्न विचारला तर अनेक जण 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेचं नाव घेतील. जवळपास ३ ते४ वर्षांपासून सुरु असलेल्या या मालिकेने नुकतेच एक हजार भाग पूर्ण केले आहेत. या निमित्ताने मालिकेच्या सेटवर मोठं सेलिब्रेशन करण्यात आलं. या सेलिब्रेशननंतर संजनाने म्हणजेच अभिनेत्री रुपाली भोसले हिने एक पोस्ट शेअर केली आहे.

"मालिकेचे हजार भाग पूर्ण झाल्यानंतर रुपालीने एका खास व्यक्तीचे आभार मानले आहेत. सोबतच या जंगी सेलिब्रेशनचा व्हिडीओ सुद्धा शेअर केला आहे."एखाद्या प्रोजेक्टला एवढं प्रेम मिळणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. इतके वर्ष आम्हाला एका कुटुंब सारखं वागवलं जातं. नमिता वर्तक थँक्यू मला संजना दिल्याबद्दल तुझा कॉल आणि तुला दिलेला शब्द मला आज सुद्धा लक्षात आहे. आणि, मी कायम त्याचप्रमाणे आणि प्रामाणिकपणे संजना लोकांसमोर सादर करेन. तुझा माझ्यावरचा विश्वास माझी ताकद आहे. मी तुझे आभार कधीच शब्दांत व्यक्त करु शकत नाही," असं रुपाली म्हणाली.

पुढे ती म्हणते, "याशिवाय मालिकेचे संपूर्ण कलाकार आणि कृ मेंबर हे एकमेकांना कायम मदत करत असतात. या मोठ्या प्रवासात सगळेच एकमेकांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहेत. आता १००० भाग झाले आहेत. पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा आणि आई कुठे काय करते टीम आणि स्टार प्रवाह रॉक्स." 
दरम्यान, ही मालिका सुरु झाल्यापासून रुपाली या मालिकेचा भाग आहे. या मालिकेत रुपालीने संजना ही भूमिका साकारली असून मधुराणी गोखले प्रभुलकर अरुंधती ही मध्यवर्ती भूमिका साकारत आहे.
 

Web Title: aai kuthe kay karte fame marathi actress rupali bhosale special thanks post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.