'वेळ कोणासाठी थांबत नाही'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2023 06:48 PM2023-05-18T18:48:07+5:302023-05-18T18:48:58+5:30

Milind gawali: अलिकडेच त्यांनी केलेल्या पोस्टमध्ये वाढत्या वयातही ग्रेसफूली कसं रहायचं हे सांगितलं आहे.

aai kuthe kay karte fame milind gawali post about age AND TIME | 'वेळ कोणासाठी थांबत नाही'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

'वेळ कोणासाठी थांबत नाही'; 'आई कुठे काय करते'फेम अभिनेत्याची पोस्ट चर्चेत

googlenewsNext

उत्तम अभिनयशैलीमुळे कायम चर्चेत राहणारा अभिनेता म्हणजे मिलिंद गवळी ( milind gawali). 'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेत ते महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये त्यांची वरचेवरच चर्चा रंगत असते. यातच ते सोशल मीडियावरही सक्रीय आहेत. त्यामुळे बऱ्याचदा ते त्यांच्या प्रोफेशनल वा वैयक्तिक जीवनातील किस्से, घटना चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यात अलिकडेच त्यांनी वाढत्या वयातही ग्रेसफूली कसं रहायचं हे सांगितलं आहे.

"Growing old Gracefully मराठी अनुवाद - आकर्शकपणे वयस्कर होणे , Time is ticking all the time for all of us. And we are getting old every second ,every moment, वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि असं म्हणतात ही वेळेतच सगळं व्हायला हवं, एकदा का वेळ निघून गेली की मग तुम्हाला काहीही करता येत नाही, आणि दुर्दैव असा आहे की खूप कमी लोकांना वेळेचे महत्त्व आहे, बऱ्याचशा लोकांना स्वतःच्या तर नाहीच पण दुसऱ्याच्या ही वेळेची अजिबात किंमत नसते. खरंतर वेळ पाळणे punctuality हा एक वेगळाच गहन विषय आहे. यावर तर मला खूपच बोलायचं आहे, पण सविस्तरपणे नंतर पण आज, Gracefully जगणं म्हणजे काय? याविषयी थोडं बोलावसं वाटतं", असं मिलिंद गवळी म्हणाले.

पुढे ते म्हणतात, "खूप लोकांना असं वाटतं की आपल्याकडे खूप वेळ आहे, पण खरंतर खूप वेळ हा कोणाकडेच नसतो, प्रत्येकाची वेळ ठरलेली असते, एक कलाकार म्हणून मी ज्यावेळेला माझ्या क्षेत्रातल्या काही लोकांकडे बघतो, आणि मला त्या लोकांचं खूप कौतुक वाटतं त्यांच्याकडे बघून छान वाटतं, आपण पण त्यांच्यासारखं व्हायला हवं किंवा त्यांचे काही गुण आपण घ्यायला हवेत असं सतत वाटत असतं, केरलाचे मोहनलाल यांच्याबरोबर मी काम केलं आहे मला हा कलाकार फार ग्रेसफुली जगतो आहे असं वाटतं, तसंच मी प्राण साहेबांबरोबर काम केलं होतं, ज्या वेळेला त्यांच्याबरोबर सिनेमा केला त्यावेळेला त्यांचं वय होतं 85, या वयात सुद्धा ते फार ग्रेसफुल होते, मी निळू भाऊ बरोबर ज्या वेळेला काम केलं त्यावेळेला सुद्धा त्यांचं वय होतं 77-78 खूप graceful होते ते, पंडित जसराज यांच्याशी माझे खूप जवळचे संबंध होते. वयाच्या 90 मध्ये सुद्धा ते इतकं सुरेख गायचे, स्वर्गातून परमेश्वर येऊन त्यांचं गायन ऐकत बसत असतील असं वाटायचं, माझे वडील Shri Shriram Gawali वयाच्या 84 वर्षात जितक्या उत्साहाने एनर्जीने काम करतात, मला इन्स्पिरेशन inspiration दुसरीकडे कुठेही बघायची गरजच नाही."दरम्यान, मिलिंद गवळी यांची ही पोस्ट सध्या नेटकऱ्यांमध्ये चर्चेत येत आहे.
 

Web Title: aai kuthe kay karte fame milind gawali post about age AND TIME

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.