अनिरुद्धच्या रिअल लाइफ अरुंधतीचा दोन वेगवेगळ्या तारखांना साजरा केला जातो वाढदिवस; कारण आहे खूपच खास
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2023 05:35 PM2023-05-10T17:35:57+5:302023-05-10T17:36:39+5:30
Milind gawali: मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये पत्नीचा वाढदिवस दोन वेगवेगळ्या दिवशी का साजरा केला जातो यामागचं कारण सांगितलं आहे.
मिलिंद गवळी हे नाव आजच्या घडीला कोणासाठीही नवीन नाही. उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांना आपलंसं केलं. सध्या ते आई कुठे काय करते. या मालिकेत अनिरुद्ध ही ग्रे शेड असलेली भूमिका साकारत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या नकारात्मक भूमिकेलाही प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देत आहेत. मिलिंद गवळी सोशल मीडियावर सक्रीय असून वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत असतात. यात नुकतीच त्यांनी एक पोस्ट शेअर करत पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
"दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, तुला सुख ,समृद्धी ,आरोग्य, यश मिळो. सदैव आनंदी रहा, खुश रहा , नेहमी सारखं सतत हसत रहाअशी ईश्वरचरणी प्रार्थना, नशीबवान आहेस तू ,तुला दोन वाढदिवस साजरे करायला मिळतात. वर्षानुवर्ष वाढदिवस ९ मे या तारखेला साजरा केला जातो. खरं तिचा जन्म दहा१० मे चा आहे. पण मग का तिचा वाढदिवस एक दिवस आधी ९ लाल केला जातो. कारण तिच्या मोठ्या बहिणीचा म्हणजे रंजूताईचा वाढदिवस नऊ मे ला असतो, मग मोठ्या बहिणीबरोबर या शेंडेफळाचा म्हणजेच दिपाचा पण वाढदिवस त्याच दिवशी साजरा व्हायचा, आणि वर्षां वर्ष हे असंच घडत होतं,आणि मग ती स्वतः विसरून गेली होती की तिचा जन्म दहा मे चा आहे. म्हणून यावर्षी मी मुद्दामून तिच्या जन्मदिवशी तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आहे. एकाच दिवशी दोघांच celebration करण्यापेक्षा दोन वेगवेगळे सेलिब्रेशनस करायला काय हरकत आहे. किंवा दोन्ही दिवशी ते साजरे करूया. खूपश्या लोकांच्या जन्म तारखेचा घोळ असतो. आणि आधीच्या पिढीचा तर खूप घोळ होता , म्हणजे आमच्या पुरकर काकांची जन्मतारीख वेगळी आणि शाळेतल्या दाखल्यामध्ये जन्मतारीख वेगळी, शाळेत ऍडमिशनसाठी वय पूर्ण नसतं म्हणून तारीख बदलायची पूर्वी एक पद्धत होती, मुलाचं वय जास्त आहे असं दाखवलं जायचं, पण नंतर घोळ असा व्हायचा की नोकरीमध्ये ते कमी वय असून सुद्धा ते लवकर रिटायर व्हायचे, बऱ्याचशा लोकांचा जन्म तारखेबरोबर जन्म वेळेचा सुद्धा खूप घोळ झाला आहे. चुकीची जन्मवेळ दिल्यामुळे जन्म पत्रिकेमध्ये भलतंच भविष्य लिहीलं जायचं. आत्ताच्या पिढीचा तसा घोळ नसावा असं मला वाटतं. आता Precise and exact time of birth दिला जात असावा. पण आता कोणी पत्रिका तयार करत असतील का याचीच मला शंका वाटते. कधी कधी तारखेचे आणि वेळेचे घोळ चांगले ही असतात. Double celebration करायला मिळतं.तर दीपा तुला दोन दोन वाढदिवसाच्या Double शुभेच्छा."
दरम्यान, मिलिंद गवळी यांनी या पोस्टसह पत्नीच्या काही निवड फोटोंचा व्हिडीओदेखील शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांच्या पत्नीच्या जीवनाचा थोडक्यात झलक दाखवण्यात आली आहे.