"ऑडिशनला तुला निवडलं आणि मला रिजेक्ट.."; पत्नीच्या वाढदिवशी मिलिंद गवळींनी सांगितला खास किस्सा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2024 09:29 AM2024-05-10T09:29:40+5:302024-05-10T09:30:17+5:30
मिलिंद गवळींनी बायकोच्या वाढदिवशी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करुन भन्नाट किस्सा सांगितला आहे. (milind gawali, aai kuthe kay karte)
आई कुठे काय करते फेम मिलिंद गवळींनी सोशल मीडियावर त्यांच्या पत्नीसाठी एक पोस्ट केलीय. आज मिलिंद यांच्या पत्नीचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मिलिंद यांनी पत्नीसोबतचा खास व्हिडीओ शेअर करुन लिहिलंय की, Happy Birthday दीपलक्ष्मी,दिपा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, मला जर कोणी विचारलं की दीपाचा हा कितवा वाढदिवस आहे तर मी म्हणेन अठरावा,कारण आजही तुझ्या मध्ये ती एनर्जी ऊर्जा जी एका कॉलेजमधल्या तरुण मुलीमध्ये असते तीच आहे , म्हणूनच अजूनही मी 23 वर्षाचा आहे."
मिलिंद गवळी पुढे लिहितात, "मला इतकी वर्ष काम करायची, मेहनत करायची जी एनर्जी मिळाली आहे ती तुझ्याकडूनच मिळाली आहे, माझ्या आयुष्याच्या खडतर प्रवासामध्ये तू कधीही तक्रार न करता, मला कायम सपोर्ट करत, माझी साथच देत आली आहेस, स्वतःच्या आशा, आकांक्षा, इच्छा, स्वप्न
सगळी सगळी बाजूला ठेवून माझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून दिलं आहेस, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवून माझ्या आवडीनिवडीच जपत आली आहेस, खरंच तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे, रोजच्या आपल्या धकाधकीच्या जीवनामध्ये शांतपणे बसून आपण एकमेकांना कधी मनातलं सांगत नाही, पण आज तुझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने तुझ्याबद्दल लिहावंसं वाटलं, आपले काही जुने फोटोज post करावेसे वाटले, मला माहितीये सोशल मीडियावर तुला personal गोष्टी टाकायला आवडत नाही, पण मला असं वाटतं कधीतरी, अशा छान दिवशी post करायला, photos टाकायला काही हरकत नाही."
मिलिंद गवळी शेवटी लिहितात, "खरंतर आज तुझा वाढदिवस आहे, खूप छान दिवस आहे , आज अक्षय तृतीया पण आहे, आज तुझ्या बद्दल एखादी पोस्ट मी करायला काहीच हरकत नाही, माझ्यासाठी तू आयुष्यामध्ये खूप sacrifices केले आहेस, Personal level वर तर केले आहेसच पण खूप कमी लोकांना ठाऊक असेल तुझा professional level चा पण sacrifice. आपलं नवीन लग्न झालं होतं आणि Iodex ची Adfilm च्या Audition साठी मला बोलवण्यात आलं होतं, तुला मी माझ्याबरोबर Auditionला घेऊन गेलो होतो आणि तिथे तुला निवडण्यात आलं होतं आणि मला reject गेलो होतो . तू त्या एकमेव Adfilmमध्ये काम केलं होतंस, पण तू माझ्यासाठी आणि आपल्या लेकी साठी आपल्या घरासाठी तुझं Career Sacrifice केलस, नाहीतर आज नक्कीच तू माझ्यापेक्षा कित्येक पटीने यशस्वी आणि popular झाली असतीस.
तुला उदंड आयुष्य लाभो, तुझी सगळी स्वप्न अशा आकांक्षा पूर्ण होऊ देत हीच ईश्वरचरणी प्रार्थना. Happy Birthday Love."