"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..."
By कोमल खांबे | Updated: February 4, 2025 12:09 IST2025-02-04T12:09:16+5:302025-02-04T12:09:45+5:30
मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले.

"कलाकारांनी लग्नच करू नये, कारण...", मिलिंद गवळींचं वक्तव्य चर्चेत, म्हणाले- "अनिरुद्ध साकारताना..."
मिलिंद गवळी हे मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहेत. सिनेमांमध्ये काम करून त्यांनी एक काळ गाजवला. गेल्या काही वर्षांपासून ते टीव्ही मालिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. मिलिंद गवळी यांनी 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारलेली अनिरुद्ध देशमुख ही व्यक्तिरेखा प्रचंड गाजली. या मालिकेत त्यांनी साकारलेल्या या खलनायकाच्या भूमिकेला प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. पण, नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या व्यक्तिरेखा साकारण्याची दुसरी बाजू आणि त्याचा वैयक्तिक जीवनावर होणारा परिणाम याबाबत भाष्य केलं.
मिलिंद गवळी यांनी पत्नीसह दिल के करीब या सुलेखा तळवळकर यांच्या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. कलाकारांनी लग्न करू नये, असं मिलिंद गवळी म्हणाले.
काय म्हणाले मिलिंद गवळी?
"कलाकारांनी लग्नच करू नये. कारण, हे प्रोफेशन असं आहे की तुम्हाला तुमच्या मेंदूवर संयम ठेवणं कठीण आहे. अनेकदा तुम्ही तुमचं मानसिक संतुलन गमावू शकता. कारण, तुम्ही तुमच्या भावना विकत असता. सिनेमा करताना ३० दिवसांनी घरी आल्यानंतर डिटॉक्स करण्यासाठी ८-१० दिवसांचा वेळ मिळायचा. पण, मालिका करताना डिटॉक्स करण्यासाठी(भूमिकेतून बाहेर पडण्यासाठी) वेळ मिळत नाही. मी जर अनिरुद्ध देशमुख किंवा रवी भंडारकर साकारत असेन. तर घरी अनिरुद्ध देशमुखही येऊ शकतो. तो तिथे सोडून घरी येता येत नाही. कारण दुसऱ्या दिवशी तोच अनिरुद्ध मी साकारतो. हे सलग ५ वर्ष काम करावं लागतं. त्यामुळे कुठेतरी मेडिशन किंवा अध्यात्म हे गरजेचं असतं".
"माझी पत्नीच्या अध्यात्मामुळे आमचा संसार अजून सुखाचा आणि सुरळीत सुरू आहे. प्रत्येक पुरुषाला हे जमायला पाहिजे", असं म्हणत मिलिंद गवळी यांनी त्यांच्या पत्नीचं कौतुक केलं.