'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2022 04:38 PM2022-09-17T16:38:38+5:302022-09-17T16:39:01+5:30

Rupali Bhosale : रुपाली भोसलेच्या नवीन लूकची सध्या सर्वत्र चर्चा होताना दिसते आहे.

Aai Kuthe Kay Karte Fame Sanjana Aka Rupali Bhosale's makeover video goes viral | 'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण

'आई कुठे काय करते'मधील संजनाचा मेकओव्हर पाहून चाहते झाले हैराण

googlenewsNext

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'आई कुठे काय करते'(Aai Kuthe Kay Karte)ने कमी कालावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेतील आप्पा, कांचन आई, अनिरुद्ध, अरुंधती, संजना, अभी, संजना, यश, अनघा, ईशा आणि गौरी या सर्वच पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. या मालिकेत संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosale) हिने साकारली आहे. ती सोशल मीडियावर सक्रीय असून या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते. तसेच ती फोटो शेअर करत असते. बऱ्याचदा ती सोशल मीडियावरील फोटोंमुळे चर्चेत येत असते. दरम्यान आता तिने मेकओव्हर केला असून तिच्या या लूकची चर्चा होताना दिसते आहे.

रुपाली भोसले हिने एक व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ती हाताने चेहरा झाकते आणि नवीन लूकमध्ये समोर येते. तेव्हा ती बॉयकटमध्ये दिसते आहे. तिचा हा लूक पाहून चाहते हैराण झाले आहेत. तिने हा लूक केल्यानंतर बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाल्याचं म्हटलं आहे.


रुपाली भोसलेचा हा लूक पाहून चाहत्यांच्या संमिश्र प्रतिक्रिया समोर येत आहेत. काहींना तिचा हा लूक आवडला तर काहींच्या तो पचनी पडलेला नाही. एका युजरने लिहिले की, छान दिसतोय हेअर कट, दुसऱ्या एका युजरने लिहिले की, कशाला कापले केस आता किती दिवस लागतील वाढायला. आणखी एका युजरने लिहिले की, वॉव सुंदर.  

रुपाली भोसले हिने आई कुठे काय करते या मालिकेव्यतिरिक्त बऱ्याच मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. तसेच सुमीत राघवनसोबत बडी दूर से आये है या मालिकेत देखील ती झळकली होती. तसेच ती बिग बॉस मराठीच्या घरातही पहायला मिळाली होती.

Web Title: Aai Kuthe Kay Karte Fame Sanjana Aka Rupali Bhosale's makeover video goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.