'आई कुठे काय करते?'मधील यश खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2021 07:00 IST2021-05-03T07:00:00+5:302021-05-03T07:00:00+5:30
‘आई कुठे काय करते?’ मालिकेतील यशच्या भूमिकेतून अभिनेता अभिषेक देशमुख घराघरात पोहचला आहे.

'आई कुठे काय करते?'मधील यश खऱ्या आयुष्यात आहे विवाहित, त्याची पत्नीदेखील आहे अभिनेत्री
स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ ही मालिका सध्या सर्वांत लोकप्रिय मालिका आहे. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. या मालिकेत यशची भूमिका साकारणाऱ्या अभिषेक देशमुखने आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांच्या मनावर छाप उमटविली आहे. मालिकेत अरूंधतीच्या पाठिशी नेहमी सावलीसारख्या उभ्या राहणारा यश घराघरात पोहचला आहे. मात्र फार कमी जणांना माहित आहे की यश म्हणजेच अभिषेक देशमुख खऱ्या आयुष्यात विवाहित असून त्याची पत्नी कृतिका देवदेखील अभिनेत्री आहे.
अभिनेता अभिषेक देशमुखने आई कुठे काय करते? या मालिकेत काम करण्याआधी पसंत आहे मुलगी या मालिकेत काम केले होते. यात त्याने साकारलेली पुनर्वसूची भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.
याशिवाय तो होम स्वीट होम या मराठी चित्रपटातही झळकला आहे. याशिवाय माधुरी दीक्षितची निर्मिती असलेला मराठी चित्रपट १५ ऑगस्टमध्येही त्याने काम केले आहे. या व्यतिरिक्त अभिषेकने वेबसीरिजमध्येही काम केले आहे.
अभिषेक देशमुख आणि कृतिका देव यांनी ६ जानेवारी, २०१८ ला विवाहबंधनात अडकले. कृतिकाने ‘राजवाडे अॅण्ड सन्स’, ‘हॅपी जर्नी’ या मराठी तर ‘हवाईजादा’ या हिंदी चित्रपटामध्ये काम केले आहे. त्याचसोबत ती ‘प्रेम हे’ मालिकेच्या सिरीजमध्ये प्रथमेश परबसोबत झळकली होती.
अभिषेक आणि कृतिका दोघेही सोशल मीडियावर सक्रीय आहे आणि ते दोघे एकमेकांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.