आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2023 02:46 PM2023-02-28T14:46:02+5:302023-02-28T14:47:37+5:30

Aai kuthe kay karte: या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे.

aai kuthe kay karte Ishas look changed The look | आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

आई कुठे काय करते: ईशाच्या लूकमध्ये झाला बदल? अरुंधतीप्रमाणे केलेला नवा लूक चर्चेत

googlenewsNext

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली लोकप्रिय मालिका म्हणजे  'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte). या मालिकेने अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. विशेष म्हणजे या मालिकेची लोकप्रियता तसूभरही कमी झालेली नाही. त्यामुळेच  या मालिकेतील अरुंधती, आशुतोष आणि संजना या मुख्य पात्रांसह अन्य भूमिकाही लोकप्रिय असल्याचं दिसून येतं. त्यातलीच एक भूमिका म्हणजे ईशाची. अभिनेत्री अपूर्वा गोरे  (Apurva Gore) हिने अरुंधतीच्या लेकीची ईशाची भूमिका साकारली आहे. विशेष म्हणजे ऑनस्क्रीन गट्टी जमणाऱ्या या मायलेकींची ऑफस्क्रीनदेखील तितकीच छान मैत्री आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेली अपूर्वा बऱ्याचदा 'आई कुठे काय करते'च्या सेटवरचे फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. यावेळीदेखील तिने असाच एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हुबेहूब अरुंधतीप्रमाणे गेटअप केला आहे. त्यामुळे ईशा अरुंधतीची छबी असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांमधून उमटत आहे.  इतकंच नाही तर ईशाचा मालिकेतील लूक चेंज झाला का? असा प्रश्नही नेटकऱ्यांना पडला आहे.

सध्या 'आई कुठे काय करते' या मालिकेत देशमुखांच्या घरी लग्नाची गडबड सुरु आहे. अरुंधती आणि आशुतोष लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. त्यामुळे घरातील प्रत्येक सदस्य लग्नाच्या धावपळीत व्यस्त आहे. यामध्येच ईशाने अरुंधतीप्रमाणे म्हणजेच तिच्या आईसारखा गेटअप करुन तिला सरप्राईज दिलं. विशेष म्हणजे ईशाचा हा लूक पाहून अरुंधतीही आश्चर्यचकित झाली असून या दोघींनी छानसा व्हिडीओ शूट केला आहे. 

दरम्यान, या व्हिडीओमध्ये ईशाने अरुंधतीप्रमाणे साधी कॉटनची साडी नेसली आहे. तर केसांची छान वेणी घातली आहे. त्यामुळे तिच्यात अरुंधतीची झलक दिसून येत आहे. इतकंच नाही तर आपल्या लेकीला असं आपल्याच रुपात पाहून अरुंधतीने तिच्यासोबत एक व्हिडीओदेखील शूट केला आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून दोघींची चांगलीच चर्चा रंगली आहे.
 

Web Title: aai kuthe kay karte Ishas look changed The look

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.