'आई कुठे काय करते' मध्ये अरुंधती अंकिताचा घर मोडण्याचा डाव यशस्वी होऊ देईल का ?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 12:28 PM2021-05-22T12:28:41+5:302021-05-22T12:53:49+5:30
'‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येतायेत.
'‘आई कुठे काय करते’ मालिकेत दिवसेंदिवस नवीन ट्विस्ट येतायेत. आज अभी आप्पांना बोलतो की, माझ्यावर रागवू नका प्लीज. आप्पा म्हणतात ठीक आहे जे झालं ते झाले, तुही आता त्याचा जास्त विचार करू नकोस.पण आजी त्याला स्प्ष्ट सांगते मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे. अंकिता आणि संजनामध्ये वाद सुरू होतो. इतक्यात अरुंधती तिथे येते आणि त्यादोघींना कडक शब्दात ताकित देते. आपण कुठे आहोत, का आहोत, जरा आजूबाजूला बघा ना, का स्वतची शोभा करून घेतायत सगळ्यांसमोर तसेच अरुंधती अंकिताला म्हणते तू तर गप्प बस. काल आली आहेस या घरात मोठ्यांशी कसं वागायचं हेही कळत नाही तुला. का हेही मीच शिकवायचं आहे. तुम्ही दोघी लक्षात ठेवा, मला या घरात भांडणाचे आवाज नकोयत. तुमच्या दोघींमुळे या घरातली शांतता भंग झालेली मला चालणार नाही. मी ठरवलं ना तर तुम्हा दोघींनाही या घरातून बाहेर पडायला भाग पाडू शकते.घर टिकवा उध्वस्त करू नका दोघी.
अंकिता अनिरुध्दकडे आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करते. अभीशी केलेलं लग्न, सुसाईडचा प्रयत्न, त्यावेळी तिची असलेली मनस्थिती हे सारं काही त्याला सांगते. तसंच मी आता या घरात आलीय तर सगळ्यांची मन जिंकून घेईल. यावर अनिरुध्द बोलतो तुला थोडे प्रयत्न करावे लागतील आणि मला खात्री आहे तू यशस्वी होशील.. यावर अंकिता बोलते तुम्ही माझ्या बाजूने राहाल ना, यावर अनिरुध्द बोलतो हो मी तुझ्या बाजूने राहिन. इतक्यात यश तिला बोलतो बाबा तुला सपोर्ट करतील. पण आम्ही कोणीही तुझ्या बाजूने राहणार नाही...असं डोक्यावर बसून कोणी लग्न करत नाही. ते लग्न टिकत नाही. त्याच्यासाठी प्रेम असावं लागतं जे अभीचं तुझ्यावर नाही आहे.
अंकिता अभीला बोलते की, तुझ्या आई बाबांचा डिव्होर्स लवकरच होईल. मग आपण तरी कशाला राहायचं इथे, यावर अभी तिला बोलतो मग यश ईशा, आजी, आप्पा यांच्याकडे कोण बघणार..लगेच अंकिता त्याला म्हणते आपण कशाला सगळ्या घरच्यांची जबाबदारी अंगावर ओढून घ्यायची. इतक्यात अरुंधती तिचं बोलणं ऐकते आणि अंकिताला म्हणते ठिक आहे. माझ्या घरच्यांची जबाबदारी घ्यायला मी समर्थ आहे पण हे घर तोडण्याचा विचारही करू नकोस .तर दुसरीकडे अंकिता संजनाशी हात मिळवणी करण्याचा प्रयत्न करते