Aai Kuthe Kay Karte : 'म्हातारे मी अरुंधती नाही...', संजनाचे वागणे पाहून कांचन यांना होतोय पश्चाताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2022 17:05 IST2022-03-01T17:05:04+5:302022-03-01T17:05:23+5:30
Aai Kuthe Kay Karte: लवकरच संजनाचे खरे रूप कांचन आईला समजणार आहे.

Aai Kuthe Kay Karte : 'म्हातारे मी अरुंधती नाही...', संजनाचे वागणे पाहून कांचन यांना होतोय पश्चाताप
आई कुठे काय करते (Aai Kuthe Kay Karte) या मालिकेत अनिरुद्धने अरुंधतीवर तिच्या चारित्र्यावरून संशय घेतो. हा आरोप सहन न झाल्यामुळे अरुंधती देशमुखांचे घर सोडून जाते आणि लवकरच अरुंधती नवीन घरात शिफ्ट होणार आहे. आशुतोष आणि अरुंधतीने आता नव्या आयुष्याची सुरुवात करावी असा सल्ला सुलेखाताईंनी दिला आहे. त्यावर हे दोघेही काय निर्णय घेतात हे पुढील भागात पाहायला मिळेल. तर लवकरच संजनाचे खरे रूप कांचन आईला समजणार आहे.
अरुंधती घर सोडून गेली आता संजनाला सुनेचा दर्जा द्यायला हवा, तरच ती आपले सर्व काही करेल असे कांचन आई आप्पांना सांगते. पण कांचनच्या या बोलण्यावर संजना मात्र वेगळाच विचार करत असते. मी या घर संसाराच्या भानगडीत अडकणार नाही. माझा हेतू साध्य झाला की सगळं घेऊन मी यातून बाहेर पडणार आहे, असा विचार संजना करत असते. अरुंधतीने काही दिवसांपूर्वी तिच्या नावावर असलेली घराची कागदपत्रे सही करून कांचन आईंकडे सुपूर्द केली आहेत.
मालिकेत आगामी भागात संजनाचे खरे रूप उलगडताना दिसणार आहे. कांचन संजनाला कामे सांगत असल्यामुळे संजना चिडून कांचन आईंना म्हातारे मी अरुंधती नाही असे ठणकावून सांगताना दिसते. घराच्या कागद पत्रांवर संजना फेरफार करून त्या जागी मोठे टॉवर उभे करणार असल्याचे सत्य कांचन यांना समजणार आहे. त्यानंतर आपण संजना आणि अनिरुद्धवर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे हे कांचन यांच्या लक्षात येणार आहे. संजना उलटसुलट उत्तरे देत असल्यामुळे आणि आपली कुठलीच कामे ऐकत नसल्याने कांचन यांना आता अरुंधतीची आठवण होताना दिसणार आहे. अरुंधतीला आपण किती छळलं त्याचा पश्चाताप कांचन यांना होणार आहे. मालिकेतील पुढच्या काही भागांमध्ये कांचन यांना कळून चुकणार आहे की आपण संजनावर विश्वास ठेवून खूप मोठी चूक केली आहे.