Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2022 12:26 IST2022-02-01T12:25:49+5:302022-02-01T12:26:47+5:30
'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) मालिका उत्कंठावर्धक वळणावर आली आहे.

Aai Kuthe Kay Karte: आशुतोष आणि अरुंधतीचा वर्तमानपत्रात छापून येणार फोटो; अनिरुद्धचा चढणार पारा
स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिका 'आई कुठे काय करते' (Aai Kuthe Kay Karte) उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. आशुतोष आणि अरुंधतीची वाढती मैत्री अनिरुद्धला पटत नाही आहे. त्यामुळे तो आशुतोषचे घरात नाव जरी घेतले तरी त्याचा जळफळाट होताना दिसत आहे. दरम्यान आता आशुतोष आणि अरुंधतीचा फोटो वर्तमानपत्रात छापून आला आहे. हे समजताच अनिरुद्धचा पारा चढणार आहे.
आई कुठे काय करते मालिकेचा नवीन प्रोमो नुकताच समोर आला आहे. ज्यात आप्पा बाहेरून हॉलमध्ये येतात आणि अरुंधतीला सांगतात की तुझा फोटो वर्तमान पत्रात छापून आला आहे. हे ऐकताच मुले सगळी खूश होतात आणि ते पेपरमधील फोटो पाहू लागतात. तेव्हा यश बोलतो की, आई आणि आशुतोषचा पेपरमध्ये फोटो छापून आला आहे. हे ऐकल्यावर अनिरुद्धच्या चेहऱ्यावरील रंग बदलतो. त्यानंतर यश पेपरमधील हेडिंग वाचतो. त्यात लिहिलेले असते की आशुतोष केळकरांचा भारतात आल्यानंतरचा पहिला म्युझिक अल्बम लवकरच आपल्या भेटीला. हे ऐकल्यावर अनिरुद्धचा पारा चढतो आणि तो यशचा हातातील फोटो घेऊन पेपर चुरगळून टाकतो आणि फेकतो. हे पाहून अरुंधतीला खूप वाईट वाटते. त्यामुळे आता पुढे काय घडणार, हे पाहणे कमालीचे ठरणार आहे.