'आई कुठे काय करते'मध्ये गौरीला मिळणार यूएसला जाण्याची संधी, यामुळे यश आणि तिच्या नात्यात येणार का दुरावा?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 12:25 PM2022-04-30T12:25:08+5:302022-04-30T13:00:03+5:30
एका सर्वसामान्य गृहिणीची कथा उत्तमरित्या सादर करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत.
एका सर्वसामान्य गृहिणीची कथा उत्तमरित्या सादर करणारी लोकप्रिय मालिका म्हणजे आई कुठे काय करते. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यात येणारे चढउतार प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहेत. सध्या या मालिकेत पुन्हा एक रंजकदार वळण आल्याचं दिसून येत आहे. ज्या संजनासाठी अनिरुद्धने अरुंधतीपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला त्याच संजनाला आता तो संजनाला आता तो कंटाळला आहे..इतकंच नाही तर संजनाच्या या रोजच्या कटकटीला घरातील प्रत्येक जण वैतागला आहे. तर दुसरीकडे कायम अरुंधतीच्या मागे ठामपणे उभा राहणार तिचा मुलगा यशच्या आयुष्यात एक नवा आव्हान येणार आहे. यशची होणारी बायको गौरीला अमेरिकेतून ऑफर आली आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये गौरी यशला या ऑफर बोलत सांगताना दिसतेय. तिला मिळालेली ऑफर ही मुंबईतली नाहीय. यश म्हणतो हरकत नाही पुणे, मुंबई, नाशिक ही ऑफर तू घे वर्षभर कर. मी ही तुला वीकेण्डला भेटायला येईल. गौरी आपलेल्या मिळालेली ऑफर यूएसची असल्याचे सांगते. एक फॅशन मॅगझीनच्या स्पर्धेसाठी मी माझं डिझायन आणि फोटो पाठवला होता. तो सिलेक्ट झालायं वेगवेगळ्या देशातील 25 मुलं यूएसमध्ये जाऊन एका डिझानरकडे शिकणार आहेत. यासाठी मला काहीच खर्च नाही आणि विशेष म्हणजे मला माझं कामही करता येईल. गौरी यशला सांगते तिला ही संधी सोडायची नाही. कारण अशा संधी पुन्हा पुन्हा येत नाहीत, म्हणून तिला ही संधी गमवायची नसल्याचं ती यशला सांगते. यावर यश तिला किती दिवसांसाठी असा प्रश्न विचारतो. गौरी दोन वर्षांसाठी असं उत्तर देते.
गौरी दोन वर्षांसाठी यूएसला गेलेल्यामुळे यश आणि तिच्या नात्यात दुरावा येणार आहे की त्यांचं नात पुरवी इतकच घट्ट राहणार. अरुंधती गौरीच्या यूएसमध्ये जाण्याच्या निर्णयाला पाठिंबा देत यशची काय समजूत काढणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.