"मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय", आई कुठे काय करते चा नवा प्रोमो बघून प्रेक्षक संतापले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:29 AM2023-04-26T11:29:45+5:302023-04-26T11:30:33+5:30
मालिकेत अरुंधती आणि आशुतोष यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. दोघंही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत आहेत.
'आई कुठे काय करते' ही मालिकेत सध्या अरुंधती आणि आशुतोष यांच्यात जवळीक वाढताना दिसत आहे. दोघंही एकमेकांसोबत रोमँटिक क्षण घालवत आहेत. मात्र प्रेक्षकांना हे फारसं काही रुचलेलं नाही. मालिकेतली आई जाम चावटपणा करायला लागली आहे असं म्हणत प्रेक्षक वैतागले आहेत.
काही दिवसांपूर्वीच 'आई कुठे काय करते' मालिकेचा एक प्रोमो व्हिडिओ रिलीज करण्यात आला. अरुंधती झोपली आहे आणि आशुतोष तिचं डोकं चेपून देत आहे. दोघांमध्ये प्रेमळ संवाद होताना दाखवला आहे. 'ती मला खूप आवडतोस', असं अरुंधती त्याला म्हणते. हा व्हिडिओ भरपूर व्हायरल झाला.
प्रेक्षकांनी हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मालिकेच्या टीमला खडेबोलच सुनावले. चिडलेल्या प्रेक्षकांनी अनेक कमेंट्स व्हिडिओखाली लिहिल्या. 'निर्माता दिग्दर्शक त्यांच्या घरातील स्टोरी सांगतात का',' अरे मालिकेचं नाव काय तुम्ही दाखवता काय, 'आईचं नाव खराब करु नका लाजा वाटू द्या' अशा अनेक कमेंट्स व्हिडिओवर आल्या आहेत.
मालिकेत आता इशाच्या साखरपुड्याची तयारी सुरु झाली आहे. अनिशशी लेकीचं लग्न लावण्यास अनिरुद्ध अजिबातच तयार नव्हता मात्र अरुंधतीने त्याची समजूत काढली. अखेर अनिरुद्ध तयार झाला. लग्न घरच्या घरीच व्हावं असा अरुंधतीचा प्रयत्न आहे पण यातही इशाने हट्ट धरला आहे. मला हवा तसाच साखरपुडा झाला पाहिजे असं इशाचं म्हणणं आहे. आता मालिकेत पुढे काय घडणार साखरपुडा सुरळीत पार पडणार का याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.