अरुंधती होणार चौथ्यांदा आई; आशुतोषने घेतलेल्या निर्णयामुळे देशमुख कुटुंब नाराज

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2023 12:44 PM2023-11-23T12:44:19+5:302023-11-23T12:44:40+5:30

Aai kuthe kay karte: आशुतोष आणि अरुंधती एका गोड मुलीचे लवकरच आई-बाबा होणार आहेत.

aai-kuthe-kay-karte-updates-arundhati-and-ashutosh-adopt-the-girl-new-promo-viral-on-social-media | अरुंधती होणार चौथ्यांदा आई; आशुतोषने घेतलेल्या निर्णयामुळे देशमुख कुटुंब नाराज

अरुंधती होणार चौथ्यांदा आई; आशुतोषने घेतलेल्या निर्णयामुळे देशमुख कुटुंब नाराज

'आई कुठे काय करते' (aai kuthe kay karte) या मालिकेने सुरुवातीच्या काळात चांगलीच लोकप्रियता मिळवली. अरुंधतीच्या आयुष्यात येत असलेल्या चढउतारांमुळे ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली. मात्र, आता या मालिकेचं कथानक लांबवलं जात असल्याचा सूर प्रेक्षकांमधून उमटू लागला आहे. यामध्येच आता या मालिकेत एक नवा ट्विस्ट आला आहे. अरुंधती लवकरच चौथ्यांदा आई होणार आहे. 

सध्या सोशल मीडियावर या मालिकेचा एक प्रोमो व्हायरल होत आहे. या प्रोमोमध्ये  आशुतोष आणि अरुंधती एका गोड मुलीचे लवकरच आई-बाबा होणार आहेत. त्यामुळे सध्या त्यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. मात्र, देशमुख कुटुंब यामुळे नाराज झालं आहे.

आशुतोष आणि अरुंधती यांनी त्यांच्या आश्रमातील एका मुलीला दत्तक घेतलं आहे. मनस्वी असं तिचं नाव असून पहिल्यांदाच ती देशमुखांच्या घरी दिवाळी साजरी करायला जाते. परंतु, तिला पाहून कांचन चांगलीच नाराज होते. इतकंच नाही तर आईमुळेच आपलं घर तुटलंय असंही इशा आजीच्या डोक्यात भरवते. त्यामुळे या मुलीला जिथून कुठून आणलंय तिला तिथे परत सोडून ये असं कांचन अरुंधतीला सांगते. त्यामुळे आता अरुंधती काय करणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, या मालिकेत अरुंधती आधीच तीन मुलांची आई दाखवली आहे. त्यातच तिला सून, नात असल्यामुळे पुन्हा चौथ्यांदा तिचं आई होणं प्रेक्षकांना पटलं नव्हतं. परंतु, आता या मालिकेत एका लहान मुलीची एन्ट्री झाल्यामुळे पुढे काय घडणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Web Title: aai-kuthe-kay-karte-updates-arundhati-and-ashutosh-adopt-the-girl-new-promo-viral-on-social-media

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.