'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2023 04:36 PM2023-03-28T16:36:00+5:302023-03-28T16:38:02+5:30

आई कुठे काय करते मालिकेच्या लेखिकेचं दु:ख पाहून मिलिंद गवळींनी शेअर केली भावूक पोस्ट

aai kuthe kay karte writer namita vartak lost her mother just after 16 days of her fathers death | 'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

'आई कुठे..' मालिकेच्या लेखिकेवर दु:खाचा डोंगर, वडिलांच्या निधनानंतर १६ दिवसांनी आईनंही सोडला श्वास

googlenewsNext

'आई कुठे काय करते' मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली आहे. यातील प्रत्येक पात्र गाजलं. मालिकेत 'आई' या व्यक्तीरेखेला पडद्यावर आणण्यात मालिकेच्या लेखिकेचं खरं योगदान आहे. नमिता वर्तक यांनी मालिकेचं लेखन केलं आहे. मात्र त्यांच्यावर आता दु:खाचा डोंगर कोसळला आहे. १६ दिवसांपूर्वीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं असून आता त्यांच्या डोक्यावरुन आईचं छत्रही हरपलं आहे. अभिनेता मिलिंद गवळी यांनी भावूक पोस्ट शेअर करत ही माहिती दिली.

लेखिका नमिता वर्तक यांच्यावर कोसळलेल्या दु:खाची कल्पनाही करता येणार नाही. नमिता यांची आई गेल्या काही दिवसांपासून आजारी होती. काल २७ मार्च रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनानंतर १६ दिवसांनी त्यांनीही प्राण सोडले आणि नमिता यांच्या डोक्यावरुन मायेचं छत्र हरपलं. 

मिलिंद गवळी पोस्टमध्ये लिहितात, 'Behind the Scene
खऱ्या आयुष्यामध्ये जे आपण डोळ्यांनी बघतो ते नेहमीच तेच खरं असतं असं नाहीये. जे आपल्याला दिसतं त्याच्यामागे खूपशा गोष्टी दडलेल्या, ज्या आपल्यासमोर कधीच येत नाहीत, आपण जे डोळ्यांनी जे पाहतो तेवडच आपल्या ला दिसत असतं, खूपशा गोष्टी behind the scene असतात आणि खूप काही between the lines ही असतं. जे कधीच नाही दिसत, आणि या सिनेमा नाटक सिरीयल या क्षेत्रामध्ये तर सगळंच behind the scene नच असतं, सिरीयल चा 23 - 24 मिनिटाचा एपिसोड साठी कित्येक दिवस बरीचशी मंडळी बरच काही करत असतात . पडद्याच्या मागे खूप काही घडत असतं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे आपल्याला दिसत नाही तो लेखक, जो रात्रंदिवस तो डोकं फोडी करत असतो, आता लोकांना काय आवडेल, कुठल्या कलाकाराचा ट्रॅक लोकांना आवडतोय, तो लिहिल्यानंतर कळतं की कलाकाराकडे dates available नाहीयेत, तो कलाकार आजारीच पडला आहे, मग परत लेखक डोके फोडी करतो, परत पुन्हा सगळं लिहून काढतो.
बर लेखकाचं जर सगळं सुरळीत चाललं असेल तर तो हे पण सगळं आनंदाने करतो, पण जर लेखकाच्याच आयुष्यात खूप काही घडत असेल , उलथा पालत होत असेल तर “आई कुठे काय करते “ च्या लेखिका नमिता वर्तक हिचे वडील प्रसिद्ध समीक्षक कमलाकर नाडकर्णी बरेच महिने आजारी होते, त्यांची सगळी सुश्रुषा करत करत दवाखान्यात सुद्धा नमिताने “आई कुठे काय करते” चे एपिसोड लिहून दिले, 11 मार्चला रात्री दहा वाजता नाडकर्णी काकां गेले, त्या दुःखात सुद्धा “ आई कुठे काय करते “ चे एपिसोड नमिताने लिहून देत होती, काल 27 मार्च रोजी म्हणजे 16 दिवसांनी आजारपणामुळे नमिताची आई गेली,
नमिताच्या दुःखाची कल्पनाच करवत नाही,
आभाळा एवढं दुःख हेच असतं बहुतेक.
हे behind the scenes
जे कधी येत नाही प्रेक्षकांसमोर..
हे सगळं सहन करायची तिला शक्ती मिळू दे हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
 

Web Title: aai kuthe kay karte writer namita vartak lost her mother just after 16 days of her fathers death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.