'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'मध्ये अभिनयाव्यतिरिक्त दडलीय ही कला, व्हिडीओ पाहून फॅन्सही करतायेत वाहवा !
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2021 17:09 IST2021-12-25T17:06:27+5:302021-12-25T17:09:38+5:30
Aai Kuthe kay karte या मालिकेच्या निमित्ताने मधुराणीनेने तब्बल १० वर्षांनी मालिकेत कमबॅक केले होते. अरुंधती या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.

'आई कुठे काय करते'मधील 'अरुंधती'मध्ये अभिनयाव्यतिरिक्त दडलीय ही कला, व्हिडीओ पाहून फॅन्सही करतायेत वाहवा !
छोट्या पडद्यावरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe kay karte )मालिकेने अल्पावधीतच रसिकांची पसंती मिळवली. मालिकेतील ट्विस्ट रसिकांच्या पसंतीस पात्र ठरत आहे.अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर ( Madhurani Prabhulkar )आज ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अरुंधतीची भूमिका साकारत आहे. आपल्या सहजसुंदर अभिनयाने अरुंधती ही भूमिका तिने गाजवली आहे. अरुंधती ही भूमिका आज घराघरात लोकप्रिय झाली आहे. अरुंधती प्रचंड हळवी आहे. सर्वांवर भरभरुन प्रेम करणारी. या मालिकेच्या निमित्ताने मधुराणीनेने तब्बल १० वर्षांनी मालिकेत कमबॅक केले होते. अरुंधती या भूमिकांमुळे तिने रसिकांची मने जिंकली आहेत.
सोशल मीडियावरही बरीच अॅक्टिव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती आपल्या फॅन्सशी संवाद साधते. सोशल मीडियावर ती फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असते. तिचा असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमधून अरुंधती म्हणजे मधुराणीमध्ये दडलेली कला जगासमोर आलीय. यांत मधुरानी गायनाचा रियाज करत असल्याचं पाहायला मिळत आहे.
या व्हिडिओवर मधुराणीच्या फॅन्सकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. अभिनयाव्यतिरिक्त मधुरानीला गाण्याची आवड आहेच. घरातूनच मधुरानीमध्ये ही कला आली आहे.मधुराणीची आई शास्त्रीय संगीत गायिका आहे.त्यामुळे लहानपणापासून मधुराणी गाणं शिकत आले. माझ्याकडे गाणं आईकडून आल्यामुळे ते हृदयाच्या जवळचं असल्याचे मधुराणी यांनी दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं.
तसंच लॉकडाऊन दरम्यानही तिने तिच्या रुटीनविषयी व्हिडीओ शेअर केला होता.घरात जेवण बनवण्यापासून ते आईसोबत गाण्याचा रियाझ करण्यापर्यत सगळ्याच गोष्टी अगदी आनंदाने मधुराणी करताना पाहायला मिळाली होती.मध्येच मुलीलाही आभ्यासात मदत करायची.या व्हिडीओच्या माध्यमातून चाहत्यांना खऱ्या आयुष्यातल्या अरुंधतीविषयी अनेक गोष्टी जाणून घेता आल्या. तसेच घरही पाहायला मिळाले. त्यामुळे घरासाठी चाहते खास कॉम्लिमेंट देताना दिसते होते.इतकं यश, लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळूनही मधुराणीमधला साधेपणा आजही कायम आहे. साधी राहणीमान, कामावरील श्रद्धा आणि कुटुंबावरील जीवापाड प्रेम यामुळे मधुराणी गोखले आज रसिकांची लाडकी अभिनेत्री बनली आहे.