ओळखलंत का या चिमुकलीला? आता आहे छोट्या पडद्यावरील लोकप्रिय आई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2022 01:19 PM2022-03-27T13:19:18+5:302022-03-27T13:21:11+5:30
Viral Photo : सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले स्टार्स अनेकदा थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. हे फोटो क्षणात व्हायरल होतात. सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा असाच एक थ्रोबॅक फोटो व्हायरल होतोय.
सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असलेले स्टार्स अनेकदा थ्रोबॅक फोटो शेअर करत असतात. हे फोटो क्षणात व्हायरल होतात. सध्या एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा असाच एक थ्रोबॅक फोटो व्हायरल होतोय. फोटो अभिनेत्रीच्या बालपणीचा आहे. या अभिनेत्रीला तुम्ही ओळखलंत?
आजवर अनेक मालिका, मराठी चित्रपटांमध्ये तिने वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. फोटोत ती भरतनाट्यम करताना दिसतेय. या अभिनेत्रीला अजूनही तुम्ही ओळखलं नसेल तर आम्ही सांगतो.
तिचं नाव आहे भार्गवी चिरमुले. भार्गवीनं तिच्या बालपणीचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती भरतनाट्यम करताना दिसतेय. अभियासोबत भार्गवीला नृत्याची देखील आवड आहे. बालपणापासून तिनं ही आवड जोपासल्याचे हे फोटो पाहिल्यानंतर लक्षात येते. भार्गवी सध्या ‘आई मायेचे कवच’ या मालिकेत मिनाक्षीची भूमिका साकारताना दिसत आहे. खूप दिवसांनी भार्गवीनं या मालिकेच्या माध्यमातून छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे.
मुंबई-गिरगाव येथे जन्मलेली भार्गवी गिरगावनंतर दादर येथे शिफ्ट झाली. राजा शिवाजी विद्यालयातून शिक्षण घेतलेल्या भार्गवीचं महाविद्यालयीन शिक्षण रुपारेल कॉलेज येथून पूर्ण झालं. भार्गवीने भरत नाट्यम नृत्यकलेचे प्रशिक्षण घेतले आहे तसेच ती योगा थेरपिस्टही आहे. भार्गवीची लहान बहीण चैत्राली गुप्ते हीसुद्धा अभिनेत्री आहे आणि तिने अभिनेता लोकेश गुप्तेसोबत संसार थाटला आहे.
भार्गवीने तिच्या अभिनय करिअरची सुरुवात नाटकांतून केली. ग्रॅज्युएशनमध्ये असतानाच कॉलेजमध्ये तिने नाटकांत भाग घेतला. ‘विश्व विनायक’ या मराठी चित्रपटात तिला पहिला ब्रेक मिळाला. त्यानंतर तिने सचिन पिळगावकर, महेश कोठारे, अशओक सराफ यांसारख्या कलाकारांसोबत काम केलं. भार्गवीने आतापर्यंत वहिनीसाहेब, चार दिवलस सासूचे, अनुबंध, असंभव, जागो मोहन प्यारे यांसारख्या मालिकांत काम केले आहे. संदूक, इश्कवाला, नवरा माझा भवरा, गोळा बेरीज अशा अनेक मराठी चित्रपटात ती दिसली. सिया के राम, स्वराज्यजननी जिजामाता यांसारख्या मालिकांमधील तिच्या भूमिकाही खूप गाजल्या.