महाराष्ट्राच्या पावनभूमीवर 'आई तुळजाभवानी'चे आगमन; मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2024 01:19 PM2024-12-04T13:19:08+5:302024-12-04T13:19:38+5:30
कलर्स मराठीवर 'आई तुळजाभवानी' मालिकेचे मार्गशीर्ष विशेष भाग पाहायला मिळणार आहेत
कलर्स मराठीवरील एक पौराणिक मालिका सध्या चांगलीच चर्चेत आहे. ही मालिका म्हणजे 'आई तुळजाभवानी'. महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या 'तुळजाभवानी' या 'कलर्स मराठी'वरील मालिकेत आतापर्यंत आई तुळजाभवानीने भक्त रक्षणासाठी केलेले अनेक चमत्कार आणि घटना पाहायला मिळाल्या आहेत. नुकत्याच आलेल्या भागांत पाहायला मिळालंय की, 'आई तुळजाभवानी'ने तिच्या सर्वात लाडक्या भक्ताचे म्हणजेच अनुभूति आणि तिच्या बाळाचे प्राण वाचवले.
महिषासूराचे खरे रूप समोर येताच तिने रौद्र रूप धारण केलेले,मात्र बाळाच्या रडण्याने तिच्यातले मातृत्व जागृत झाले.देवीचा आईपणाचा हा भावनिक प्रवास ह्रदयस्पर्शी आहे. आता अनुभूति मातेचा आश्रम सोडून आई तुळजाभवानीचा नवा प्रवास सुरू होणार आहे.ज्या प्रदेशाची ती कुलस्वामिनी होणार आहे. 'आई तुळजाभवानी' ही मालिका प्रेक्षकांना दररोज रात्री 9 वाजता आपल्या लाडक्या 'कलर्स मराठी'वर पाहता येईल. 'आई तुळजाभवानी' या मालिकेचा मार्गशीर्ष महिन्याच्या शुभ मुहूर्तावर विशेष भाग पार पडणार आहे.
सह्यगिरीच्या कुशीत, महाराष्ट्राच्या पावनभूमीवर कुलस्वामिनी 'आई तुळजाभवानी'चे आगमन होणार आहे. तुळजाभवानी निस्सीम भक्त आबासाठी ती दक्षिणेकडे येणार आहे. तिचे या दुष्काळी भागात येणे आणि त्यापाठचे तिचे प्रयोजन, भक्त रक्षणाचे घडणारे चमत्कार पण बरोबरीने तिने लोकांमध्ये जागवलेली अस्मिता हा उत्कंठावर्धक कथाभाग यादरम्यान उलगडेल. तेव्हा 'आई तुळजाभवानी' मालिकेचे मार्गशीष विशेष भाग दररोज रात्री ९.०० वा कलर्स मराठीवर पाहायला मिळतील.