'या' कारणासाठी आकृती शर्माने नाकारल्या चित्रपटाच्या ऑफर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2018 06:30 AM2018-12-07T06:30:00+5:302018-12-07T06:30:00+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माने आपल्या निरागस अभिनयाने अवघ्या आठ महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे

Aakarti sharma truns down movie offers for kullfi kumarr bajewala | 'या' कारणासाठी आकृती शर्माने नाकारल्या चित्रपटाच्या ऑफर

'या' कारणासाठी आकृती शर्माने नाकारल्या चित्रपटाच्या ऑफर

googlenewsNext
ठळक मुद्देआकृतीला तिच्या लोकप्रियतेमुळे बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील चित्रपटातील भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.

‘स्टार प्लस’वरील ‘कुल्फीकुमार बाजेवाला’ मालिकेत कुल्फीची भूमिका साकारणाऱ्या आकृती शर्माने आपल्या निरागस अभिनयाने अवघ्या आठ महिन्यातच प्रेक्षकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिच्या लोकप्रियतेमुळे तिला आता बॉलीवूड आणि टॉलीवूडमधील चित्रपटांतील भूमिकांच्या ऑफर येऊ लागल्या आहेत.

अर्थातच या वाहिनीवरील सर्वात लोकप्रिय मालिका आणि त्यात कुल्फीचे नाव घरोघरी पोहोचले असल्याने तिला चित्रपटात भूमिका साकारण्यासाठी ऑफर आल्या, तर त्यात नवल काहीच नाही. या ऑफरमुळे आकृती शर्मा आनंदित झाली असली, तरी चित्रपटांमध्ये भूमिका रंगविण्याची ही योग्य वेळ नाही, असे तिचे मत बनले आहे. या मालिकेत आपली भूमिका रंगवीत तिचे कथानक पुढे नेण्यातच आपले हित आहे, असे तिने म्हटले आहे. चित्रपटांतील भूमिकांच्या ऑफरसंदर्भात आकृती म्हणाली, “हो, मला हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात भूमिका रंगविण्यासाठी ऑफर आल्या आहेत. चित्रपटात मला भूमिका देऊन माझ्या कलेला मान्यता देणाऱ्या प्रत्येकाची मी आभारी आहे. सध्या तरी मी कुल्फीकुमार बाजेवाला मालिकेवरच माझं लक्ष केंद्रित करणार आहे. पण मी लवकरच चित्रपटांमधून भूमिका स्वीकारीन.” ती म्हणाली, “या मालिकेचं कथानक पुढे सरकत असताना त्यावर प्रेक्षकांच्या काय प्रतिक्रिया उमटतील, याची मला उत्सुकता असून या प्रेक्षकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादामुळेच मला चित्रपटांतून ऑफर मिळू शकल्या.”

Web Title: Aakarti sharma truns down movie offers for kullfi kumarr bajewala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.